FRP
FRPAgrowon

Sugarcane FRP : एफआरपी पूर्ण न करताच मिळतोय गाळप परवाना

साखर आयुक्त कार्यालयाची बोटचेपी भूमिका

सातारा : एफआरपी (FRP) पूर्ण करणाऱ्या साखर कारखान्यांनाच (Sugar Mill) गाळप परवाना द्यावा, अशी मागणी ऊस उत्पादक (Sugarcane Producers) व शेतकरी संघटनांतून होत आहे. मात्र, साखर आयुक्त कार्यालयाकडून धडाधड गाळप परवाने दिले जात आहेत. जिल्ह्यातील काही कारखान्यांनी एफआरपीची रक्कम पूर्ण केली असून, उर्वरित कारखान्यांनी १२५ ते १४० रुपये अद्याप दिलेले नाहीत. जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी कारखाने वेळेत सुरू करण्याचे आवाहन साखर आयुक्तांनी केले आहे.

FRP
Sugar Mill : ऊसदर जाहीर करूनच कारखाने सुरू करा : सचिन नलवडे

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले असून आगामी आठवडाभरात साखर कारखाने मोळी टाकणार आहेत. तर साखर आयुक्तांनी १५ ऑक्टोबरपासूनच गाळप सुरू करण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या कारखान्यांनी आपली जाहीर केलेली एफआरपी पूर्ण केली आहे.

FRP
Sugar Mill : भीमा साखर कारखाना इथेनॅाल प्रकल्प उभा करणार

तर, तर काही कारखान्यांची मागील देणीही बाकी आहे. मागील वर्षी जास्तीच्या उसामुळे व तीन कारखाने बंद राहिल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली होती. त्याचा कारखानदारांनी फायदा घेत दोन-तीन टप्प्यांत एफआरपीची रक्कम दिली. मुळात कायद्याप्रमाणे एकरकमी एफआरपी १४ दिवसांत देणे बंधनकारक आहे.

पण तो नियम कोणीही पाळला नाही. आता नव्याने सुरू होणाऱ्या हंगामाची तयारी कारखान्यांनी केली आहे. जिल्ह्यातील किसन वीर, खंडाळा व प्रतापगड हे तीन कारखाने यावेळेस सुरू होणार आहेत. त्यापैकी खंडाळा कारखान्यास गाळप परवाना मिळाला आहे.

त्यामुळे खंडाळा तालुक्यातील ऊस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. वाई व जावळी तालुक्यांतील किसन वीर व प्रतापगड कारखाना सुरू होणार असल्याने या दोन तालुक्यांतील उसाचा प्रश्न मिटणार आहे. मात्र, एफआरपी पूर्ण न करताच काही कारखाने गाळप करणार आहेत.

त्यांच्याविषयी साखर आयुक्त कार्यालयाची बोटचेपी भूमिका दिसत आहे. बहुतांशी साखर कारखाने हे लोकप्रतिनिधींचे आहेत. तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊसही उपलब्ध आहे. त्यामुळे वेळेत ऊस जाण्यासाठी कारखाने सुरू होणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com