Banana : अकोला, बुलडाण्यात केळीवर ‘कुकुंबर मोझॅक’चा प्रादुर्भाव

केळीच्या रोपांवर यंदा धुमाकूळ घालत असलेला कुकुंबर मोझॅक विषाणूचा प्रादुर्भाव बुलडाणा व अकोला जिल्ह्यातील केळी बागांमध्येही दिसून येत आहे.
Banana Cucumber Mosaic
Banana Cucumber MosaicAgrowon

अकोला ः केळीच्या रोपांवर यंदा धुमाकूळ घालत असलेला कुकुंबर मोझॅक विषाणूचा (CMV Outbreak On Banana) प्रादुर्भाव बुलडाणा व अकोला जिल्ह्यातील केळी बागांमध्येही (Banana Orchard) दिसून येत आहे. सध्या याचे प्रमाण १५ ते २० टक्क्यांपर्यंत दिसून येत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात केळी उत्पादनासाठी (Banana Production) प्रसिद्ध असलेल्या काकनवाडा येथे कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी भेट देत शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. त्यावेळी या विषाणूच्या प्रसाराची गंभीरता त्यांच्याही निदर्शनात आली.

Banana Cucumber Mosaic
Banana Disease : केळीवरिल कुकुंबर मोझॅक रोगाचं नियंत्रण कस कराल?

संग्रामपूर तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे, केव्हीके प्रमुख विकास जाधव, प्लँट प्रोटेक्शन तज्ज्ञ अनिल गाभणे, उद्यानविद्या तज्ज्ञ शशांक दाते यांच्या चमूने काकनवाडा शेतशिवारात विविध शेतांमध्ये जाऊन भेटी दिल्या. या भावात यंदा जुलैमध्ये बहुतांश केळीची लागवड झालेली आहे. शेतकऱ्यांनी टिश्यू कल्चरची रोपे प्रामुख्याने गुजरातेतून मागवल्याचे सांगितले जाते. सध्या विषाणूचा प्रादूर्भाव काही ठिकाणी १५ ते २० टक्क्यांपर्यंत पोचलेला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर, अकोल्यातील तेल्हारा, अकोट या पट्ट्यात केळीच्या बागा मोठ्या संख्येने आहेत. केळीचे आगार म्हटल्या जाणाऱ्या अकोला जिल्ह्यातील पणज भागात या विषाणूचा प्रादुर्भाव अल्प प्रमाणात आहे.

Banana Cucumber Mosaic
Banana Cucumber Mosaic : ‘कुकुंबर मोझॅक’मुळे केळी बागा काढून फेकल्या

केळी उत्पादकांनी वेळीच उपाययोजना सुरू केल्याने प्रादुर्भाव वाढण्यापासून रोखण्यात यश मिळाल्याचे शेतकरी सांगत आहेत. तेथे फारसे नुकसान आजवर झालेले नाही. काकनवाडा शिवारात मात्र हा प्रादुर्भाव १५ ते २० टक्क्यांपर्यंत पोचल्याने चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे.

यंदा सलग पावसामुळे केळीमध्ये अनेक अडचणी तयार होत आहेत. प्रामुख्याने टिश्यू कल्चर बेण्याची लागवड असलेल्या बागेत हा प्रादुर्भाव अधिक झालेला असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. पट्ट्यात शेकडो एकरांवर यंदाही नवीन लागवड झालेली आहे. हंगामाच्या प्रारंभीच या विषाणूचा प्रसार वाढू लागल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. या संदर्भात योग्य उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शनाची मागणी शेतकरी करीत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com