‘एक गाव एक वाण’मधून ६१ गावांत कापूस लावणार

नगर जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टरवर लागवडीचे नियोजन
‘एक गाव एक वाण’मधून ६१ गावांत कापूस लावणार
Cotton cultivationAgrowon

नगर ः कापसाच्या पिकांचे उत्पादन (Cotton Production) ते विक्री करेपर्यंत सोपे जावे. एकाचवेळी सर्व शेतकऱ्यांचे पीक निघावे, यासह अन्य फायद्यासाठी नगर जिल्ह्यात कृषी विभागाने ६१ गावांत ‘एक गाव एक वाण’ (One Village One Verity) उपक्रमातून ५ हजार ६६५ हेक्टर क्षेत्रावर लागवड (Cotton Cultivation) करण्याचे नियोजन केले आहे. लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी, नेवासा तालुक्यांत कापसाचे क्षेत्र अधिक आहे. अलीकडच्या काळात जामखेड, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत, कोपरगाव तालुक्यांतही कापसाचे क्षेत्र वाढत आहे. वेगवेगळ्या वाणांची लागवड करताना पीक हाती येण्याचाही कालावधी कमी-जास्त असतो. त्यामुळे दरवर्षी कृषी विभागाकडून ‘एक गाव एक वाण’ उपक्रमातून कापसाची लागवड केली जाते. या उपक्रमाची जनजागृती होणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे उपक्रमाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

यंदा या उपक्रमातून नगर तालुक्यात नऊ गावांत ७७४ हेक्टर, पाथर्डी तालुक्यात १३ गावांत १४६० हेक्टर, कर्जतमध्ये ३ गावांत ८२ हेक्टर, श्रीगोंद्यात ७ गावांत १९० हेक्टरवर, श्रीरामपूरला २ गावांत १३० हेक्टर, राहुरीला ४ गावांत १९७ हेक्टर, नेवाशाला ४ गावांत ४८० हेक्टर, शेवगावला ८ गावांत १२०० हेक्टर, संगमनेरला १ गावांत ६५, कोपरगावला ६ गावांत ६२४ हेक्टर, राहाता तालुक्यात ५ गावांत ४९० हेक्टर, अशी ६१ गावांत ५ हजार ६६५ हेक्टरवर लागवड करण्याचे नियोजन केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com