Millets :भरडधान्यांची अधिकाधिक लागवड करा - पंतप्रधान

पंतप्रधान मोदी यांनी रविवारी (ता. २८) `मन की बात'मधून जनतेला संबोधित केलं आहे. या वेळी मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांनी एक ठराव मंजूर करून २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले असल्याची माहिती या वेळी दिली.
Cereals
CerealsAgrowon

दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Naredra Modi) यांनी शेतकऱ्यांना अधिकाधिक भरडधान्यांची लागवड करण्याचे आवाहन केलं आहे. त्यांनी रविवारी (ता. २८) `मन की बात' (Mann Ki Baat) मधून जनतेला संबोधित केलं.

भारताच्या पुढाकारातून संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष (International Millet Year) म्हणून घोषित केले असल्याची माहिती मोदी यांनी यावेळी दिली.

Cereals
उन्हाळ पिकांमध्ये कडधान्य, तृणधान्य, तेलबियांना पसंती

पंतप्रधान म्हणाले, की भारत हा जगातील सर्वांत मोठा भरडधान्य उत्पादक देश आहे, त्यामुळे हा उपक्रम यशस्वी करण्याची जबाबदारीही भारतीय लोकांच्या खांद्यावर आहे. आपण सर्वांनी मिळून याला एक जनआंदोलन बनवायचे आहे आणि देशातील लोकांमध्ये भरडधान्याबद्दल जागरूकता वाढवायची आहे. आज देशभरात भरडधान्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बरेच प्रयत्न केले जात आहे. यासंबंधित संशोधन आणि नावीन्यपूर्ण उपयोगांवर लक्ष केंद्रित करण्यासोबतच FPOsला (शेतकरी उत्पादक संघा) प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे उत्पादन वाढवता येईल.

देशातील शेतकरी बंधू-भगिनींनी भरडधान्यांची अधिकाधिक लागवड करावी, असं आवाहनही मोदी यांनी केलं. मोदी म्हणाले, की संयुक्त राष्ट्रांनी ठराव मंजूर करून २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केलं आहे. तुम्हाला हे जाणून खूप आनंद होईल, की भारताच्या या प्रस्तावाला ७० हून अधिक देशांचा पाठिंबा मिळाला. आज जगभरात या भरडधान्याची क्रेझ वाढत आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी आदी भरडधान्ये प्राचीन काळापासून आपल्या शेतीचा, संस्कृतीचा आणि सभ्यतेचा भाग आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com