Mulberry Cultivation : तुतीची लागवड करून रेशीम शेती करावी

महारेशीम अभियानादरम्यान शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत एक पूरक व्यवसाय म्हणून तुती लागवड करून रेशीम शेती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी महारेशीम अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
Silk Farming
Silk FarmingAgrowon

वर्धा : महारेशीम (Silk Farming) अभियानादरम्यान शेतकऱ्यांनी (Farmer) पारंपरिक शेतीसोबत (agriculture) एक पूरक व्यवसाय म्हणून तुती लागवड करून रेशीम (Silk) शेती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी महारेशीम अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

Silk Farming
Rabi Crop Insurance : गेल्या रब्बीसाठीचा १८ कोटी ७८ लाखांचा पीकविमा मंजूर

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच शेतीसाठी एक उत्तम पूरक व्यवसाचा पर्याय म्हणून रेशीम शेतीबाबत जनजागृती व्हावी व सर्वसामान्य शेतकऱ्यांना गावागावांमधून रेशीम शेतीचे महत्त्व पटवून सांगण्यासाठी रेशीम विकास विभागाच्या वतीने १५ डिसेंबरपर्यंत महारेशीम अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या महारेशीम अभियानाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. या वेळी त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रति एकर ३ लाख ४२ हजार ९०० रुपये तीन वर्षांसाठी तुती लागवड व कीटक संगोपन बांधकामाकरिता लाभ देण्यात येते. कृषी विभागाच्या पोखरा योजनेअंतर्गत तुती लागवड, कीटक संगोपन बांधकाम, कीटक संगोपन साहित्यासाठी सर्वसाधारण लाभार्थ्यांना ७५ टक्के, तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना ९० टक्के अनुदान देण्यात येते.

ज्या लाभार्थ्यांना मनरेगा व पोखरा या दोन्ही योजनेचा लाभ घेता येत नाही, अशा सर्व लाभार्थ्यांकरिता केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र-२ योजनेअंतर्गत दोन एकर रेशीम शेतीसाठी अंदाजपत्रकीय रक्कम ७ लाख ५० हजार रुपयांमधून सर्वसाधारण लाभार्थ्यांना ७५ टक्के, तर अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना करिता ९० टक्के अनुदान देण्यात येते, असेही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले या वेळी बोलताना म्हणाले.

Silk Farming
Silk Farming : कसा असावा रेशीम आराखडा?

शेतकऱ्यांना रेशीमची परिपूर्ण माहिती नसल्याने या शेती उद्योगाकडे मोठ्या

प्रमाणात शेतकरी वळल्याचे दिसून येत नाही. मनरेगा, पोखरा, केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र योजनेअंतर्गत तुती रेशीम उद्योगात महिलांचा सहभाग वाढविणे, तुती वृक्षाची लागवड करून पर्यावरणाचा संतुलन राखणे व उत्पादनात वाढ करणे तसेच रेशीम तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता जिल्ह्यात महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. या महारेशीम अभियानाचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी यांनी केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com