Onion Cultivation : कांदा, टोमॅटो, बटाट्याची ७६४ हेक्टरवर लागवड

परभणी जिल्ह्यात गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मोठे, मध्यम, लघु प्रकल्पामध्ये पाणीसाठा आहे. सिंचन आवर्तन सुरु आहेत. काही वर्षात सिंचन विहिरी, विंधन विहिरींची संख्या वाढली आहे.
Onion Planting
Onion PlantingAgrowon

परभणी ः परभणी जिल्ह्यात २०२२-२३ या वर्षी मंगळवार (ता.१०) पर्यंत कांद्याची ५७१ हेक्टर (Onion Planting), टोमॅटोची १६३ हेक्टर (Tomato Planting), बटाट्यांची ३० हेक्टर (Potato planting) अशी या तीन पिकांची मिळून एकूण ७६४ हेक्टरवर लागवड झाली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा या भाजीपाला पिकांच्या क्षेत्रात किंचित वाढ झाली आहे अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी (Agricultural Department) दिली.

परभणी जिल्ह्यात गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मोठे, मध्यम, लघु प्रकल्पामध्ये पाणीसाठा आहे. सिंचन आवर्तन सुरु आहेत. काही वर्षात सिंचन विहिरी, विंधन विहिरींची संख्या वाढली आहे.

अनेक शेतकऱ्यांकडे अस्तरीकरणाच्या शेततळ्यामुळे संरक्षित पाणीसाठा उपलब्ध आहे. सिंचनासाठी विविध पर्याय उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांचा बागायती पिकांकडे वाढला आहे.

Onion Planting
Potato Crop Insurance : पीकविमा योजनेत बटाटा घेण्यासाठी प्रयत्न करणार

दररोजचे उत्पन्न देणाऱ्या भाजीपाला पिकांच्या लागवड क्षेत्रात गेल्या काही वर्षात वाढ झाली आहे. कांदा, टोमॅटो या पारंपारिक पीकांसोबत गेल्या दोन चार वर्षात जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शेतकरी बटाट्याचे उत्पादन घेत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com