
Orchard Cultivation नगर ः महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून (Employment Guarantee Scheme) यंदा आतापर्यंत ४० हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड (Orcharad Cultivation) झाली आहे. मागील दोन वर्षांचा लागवडीला मिळालेला प्रतिसाद पाहता यंदा साठ हजार हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
सात जिल्ह्यांनी उद्दिष्टापेक्षा अधिक लागवड केली आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून लागवड अनुदानाबाबत नव्याने आकृतिबंधाला लवकर मान्यता मिळाली नव्हती.
त्यामुळे यंदा फळबाग लागवडीबाबत मान्यतेला उशीर होत असल्याने लागवड क्षेत्र कमी होण्याचा अंदाज होता. मात्र लागवडीचा वेग पाहता यंदा गतवर्षीपेक्षा अधिक लागवड होण्याचा अंदाज आहे.
राज्यात गेल्या काही वर्षांपासून ‘मगांराग्रारोहयो’तून फळबाग लागवडीला प्राधान्य दिले आहे. मागील तीन वर्षात चांगली लागवड झाल्याने यंदा राज्यात ६० हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे कृषी विभागाने उद्दिष्ट निश्चित केले होते.
त्यासाठी कृषी सहाय्यकांवर जबाबदारी दिली. यंदा ‘मगांराग्रारोहयो’तून फळबाग लागवडीसाठी नव्याने दरांबाबतच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्याला उशीर झाला. त्यामुळे यंदा फळबाग लागवडीचा वेग कमी राहण्याची शक्यता व्यक्त होत होती.
मात्र आक्टोबरपासून फळबाग लागवडीला वेग आला. राज्यात ९ हजार १६९ कृषी सहाय्यक आहेत. त्यांच्याद्वारे फळबाग लागवड यंदा पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
गेल्यावर्षी ४२ हजार हेक्टरवर लागवड झाली. यंदा अजून एक महिना शिल्लक असल्याने फळबाग लागवडीचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज आहे.
आतापर्यंत झालेल्या फळबाग लागवडीनुसार गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, यवतमाळ, वाशीम, ठाणे जिल्ह्यांत उद्दिष्टापेक्षा अधिक क्षेत्रावर फळबाग लागवड झाली आहे.
त्यात वर्धा व गोंदिया जिल्ह्यात उद्दिष्टाच्या दुप्पट लागवड झाली आहे. हिंगोली, बीड, कोल्हापूर, सातारा, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांत मात्र कमी लागवड झाली आहे.
९४ हजार ८३३ शेतकऱ्यांकडून अनुदानाची मागणी
यंदा ९४ हजार ८३३ शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीसाठी अनुदान मागितले आहे. ६६ हजार ५०० हेक्टरसाठी प्रशासकीय व तांत्रिक मान्यताही देण्यात आली आहे.
यंदा ‘मगांराग्रारोहयो’सह राज्य शासनाची स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनाही सुरु आहे. पाच एकरांपेक्षा अधिक व जॉबकार्ड नसलेले शेतकरी या योजनेतून फळबाग लागवड करत आहेत.
जिल्हानिहाय लागवड (कंसात उद्दिष्ट, लागवड हेक्टरमध्ये)
ठाणे ः १०८०, ठाणे : १०८० (१०८०), पालघर :१९०९ (२७००), रायगड ः १९९८ (२५६०), रत्नागिरी : १७९९ (४८२०), सिंधुदुर्ग : १६५९ ( ३०२०), नाशिक : २२०४ ( ४५००),
धुळे : ७५४ (१२५०), नंदुरबार : १५६९ (२२००), जळगाव ; १३९७ (२५००), नगर : १६५८ (३५००), पुणे : २१६२ (२५००), सोलापूर : १६३६ (३५००), औरंगाबाद : ५९२ (१२००),
जालना ः १३२१ (१८००), बीड ः २०४ (७५०) लातूर ः ११६४ (१२००), उस्मानाबाद ः ३३५( १११०), नांदेड ः २७७ (१५९०), परभणी ः ११९९ (१२२०)., हिंगोली ः २१२ (६९५),
बुलडाणा ः १३४० (१५१५), अकोला ः ७४७ (१२४०), वाशिम ः ८४८ (७६०), अमरावती ः १६१५ (१९४०), यवतमाळ ः १९८६ (१७०५), वर्धा ः १९८६ (९२०), नागपूर ः ११९१ (१२२०),
भंडारा ः ६०० (६२०), गोंदिया ः ११०३ (५१५), चंद्रपुर ः ११२९ (१०२०), गडचिरोली ः ७११ (७००)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.