Rabbi Season : बुलडाण्यात रब्बीची लागवड २० टक्क्यांपर्यंत

वऱ्हाडात रब्बी हंगामात सर्वाधिक क्षेत्र राहणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातही यंदा लागवड उशिराने होत आहे.
Rabbi Season
Rabbi Season Agrowon

बुलडाणा ः वऱ्हाडात रब्बी (Rabbi) हंगामात सर्वाधिक क्षेत्र राहणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातही यंदा लागवड उशिराने होत आहे. अर्धा नोव्हेंबर लोटत असताना जिल्ह्यात रब्बीची लागवड २५ टक्क्यांच्या आतच राहिलेली आहे. पुढील आठवड्यात हे क्षेत्र जोमाने वाढण्याची शक्यता आहे.

Rabbi Season
Onion Market : लासलगाव बाजार समितीत कांद्याला ७०० ते ३०५३ रुपये दर

वऱ्हाडात बुलडाणा जिल्ह्यातील लागवड तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक राहते. कृषी विभागाच्या नोंदीनुसार सरासरी क्षेत्र दोन लाख २७ हजार एवढे आहे. मात्र, मागील काही वर्षांत रब्बीची लागवड सातत्याने वाढत गेलेली आहे. यंदाही रब्बीत तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक पेरणीचा अंदाज आहे.

कृषी विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यात आजवर सुमारे २० टक्के रब्बी पेरणी आटोपली. यात प्रामुख्याने हरभऱ्याची ३६ हजार ५९ हेक्टरवर लागवड झाली. हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र एक लाख ४६ हजार हेक्टर असून, त्या तुलनेत २५ टक्के हरभरा लागवड झाली. जिल्ह्यात गहू लागवड दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Rabbi Season
CIBIL Agri Loan: शेती कर्जांना ‘सीबील’मधून वगळण्याच्या मागणी | ॲग्रोवन

५५३९६ सरासरी हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत तीन हजार हेक्टरपर्यंत लागवड पोहोचली. या जिल्ह्यात मक्याची विदर्भात सर्वाधिक लागवड केली जाते. मक्याचे सरासरी ११७८१ हेक्टर क्षेत्र आहे. आजवर २६३ हेक्टरवरच पेरणी झाली. रब्बी ज्वारीचीही घाटावरील तालुक्यांमध्ये पेरणी अधिक होत असते. प्रामुख्याने सरासरी १२७६० हेक्टरच्या तुलनेत २६६३ हेक्टरवर पेरणी झालेली आहे.

Rabbi Season
Crop Insurance : मंत्री सावे यांनी पीक विमा कंपन्यांना दिला इशारा | ॲग्रोवन

सरासरीपेक्षा अधिकच लागवड

कृषी विभागाकडे रब्बीचे सरासरी क्षेत्र दोन लाख २७ हजार हेक्टर क्षेत्र आहे. मात्र दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक हरभऱ्याचे पीक लागवड होत असते. यंदा सुद्धा रब्बीसाठी पोषक वातावरण असल्याने पेरण्या उशिरा सुरू झाल्या तरी लागवड पूर्णत्वास जाईल. नोव्हेंबर अखेर रब्बीची बहुतांश लागवड पूर्ण झालेली असू शकते. आता खऱ्या अर्थाने हरभरा, गहू लागवड वेग घेत आहे.

पीक सरासरी प्रत्यक्ष टक्केवारी

रब्बी ज्वारी १२७६० २६६३ २०.७९

गहू ५५३९६ २९९४ ५.४०

मका ११७८१ २६३ २.२४

हरभरा १४६४४० ३६०५९ २४.६२

करडई १०३ ९६.२० ९२.५२

एकूण २२७२१४ ४२२३१ १९.५९

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com