Sugarcane Cultivation : रोपांद्वारे ऊसलागवडीचा राज्यात कल वाढला

ऑक्टोबरमध्ये जोरदार झालेल्या पावसाचा अनुकूल परिणाम नव्या ऊस लागवडीवर होत आहे. बहुतांश ठिकाणी पाण्याची मुबलक सोय झाल्याने अंतिम टप्प्यातील पूर्व हंगामी व सुरुवातीच्या टप्प्यातील सुरू हंगाम ऊस लागवडी वेगात सुरू झाल्या आहेत.
Sugarcane cultivation
Sugarcane cultivationAgrowon

कोल्हापूर : ऑक्टोबरमध्ये जोरदार झालेल्या पावसाचा अनुकूल परिणाम नव्या ऊस लागवडीवर (Sugarcane Cultivation) होत आहे. बहुतांश ठिकाणी पाण्याची मुबलक सोय झाल्याने अंतिम टप्प्यातील पूर्व हंगामी व सुरुवातीच्या टप्प्यातील सुरू हंगाम ऊस लागवडी (Sugarcane Farming) वेगात सुरू झाल्या आहेत.

Sugarcane cultivation
Sugarcane Season : ऊसतोडीसाठी पैशांची मागणी करणाऱ्यांविरोधात कारवाई

विशेष म्हणजे यंदा पारंपरिक वाणाबरोबर अन्य वाणांनाही मागणी वाढली आहे. कालावधी व मशागतीचा खर्च वाचत असल्याने शेतकऱ्यांनी रोपांना यंदाही अधिक प्राधान्य दिले आहे. सध्या राज्यातील शेतकऱ्यांची ऊस रोपांची मागणी पूर्ण करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील ऊस रोपवाटिकामध्ये लगबग सुरू आहे.

Sugarcane cultivation
Sugarcane Cultivation : ऊस बेणे विक्रीसाठी उपलब्ध

ऐन खरीप काढणीच्या वेळी जोरदार पावसाने राज्यभरात हजेरी लावली. याचा फटका ऊस पट्ट्यालाही बसला. गळीत हंगाम वेळेसच जोरदार पाऊस आल्याने यंदाचा गळीत हंगाम जवळजवळ महिनाभर लांबला. यामुळे खरिपाची काढणी व सध्या असलेल्या उसाची तोडणी करून पुन्हा लागवड करण्याच्या ऊस उत्पादकांच्या प्रयत्नाला धक्का बसला. पाऊस थांबल्यानंतर मात्र राज्यभरात झपाट्याने खरिपाची काढणी झाली तसेच हंगामाचा वेग ही वाढला यामुळे शेतकऱ्यांचे शेत रिकामे होऊ लागले आहे.

ऊस पट्ट्यातील बहुतांशी गावामध्ये चांगला पाऊस झाल्याने विहिरी कूप नलिकांना शाश्वत पाण्याची सोय उपलब्ध झाली आहे. यामुळे शेतकरी उसाला प्राधान्य देत आहेत.
सध्या राज्यात अंतिम टप्प्यातील पूर्व हंगामी व सुरू हंगामाच्या लागवडी सुरू आहेत. लागवड कालावधी आणि व्यवस्थापन खर्च वाचत असल्याने यंदाही बहुतांशी शेतकऱ्यांनी कांडी लावणी ऐवजी ऊस रोपांनाच प्राधान्य दिले आहे.

रोपवाटिकांमध्ये दररोज राज्यभरातील शेतकऱ्यांबरोबरच कर्नाटक व गुजरातमधून ही मागणी वाढत असल्याचे रोपवाटिका चालकांनी सांगितले. जोरदार पावसामुळे ठप्प झालेल्या मागणीला गेल्या पंधरा दिवसांपासून वेग आल्याने रोपवाटिकांमध्ये रोपे तयार करण्याची धांदल सुरू आहे.

अन्य वाणांनाही शेतकऱ्यांची पसंती
गेल्या दोन वर्षांपासून चांगल्या उत्पन्न देणाऱ्या वाणांबरोबरच तोडणीला सोईस्कर असणारे वाणही महत्त्वाचे ठरले आहेत. जो ऊस पडत नाही व तो यंत्राने सहज तोडता येतो अशा वाणांना मागणी वाढत आहे. प्रचलित २६५, ८६०३२ या वाणांबरोबरच १८१२१ व एसएनके १३३७४ आदी वाणही शेतकरीप्रिय ठरत आहेत.

Sugarcane cultivation
PDKV Crop Verity : ‘पंदेकृवि’च्या तीन वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता

यंदा ऊस रोपांना मागणी चांगल्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांकडे विविध वाणांची ही मागणी आहे. काही पारंपरिक टंचाई असली तरी ऊस उत्पादकांकडून अन्य वाणांना चांगली मागणी आहे.
- प्रल्हाद पवार,
रोपवाटिका चालक, जांभळी, जि. कोल्हापूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com