विधानपरिषदेसाठी सदाभाऊ खोत, पंकजा मुंडेंचा पत्ता कट

पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत या नेत्यांच्या नावाला कात्री लावण्यात आली आहे. शेतकरी प्रश्नावर गेल्या काही दिवसांपासून सक्रिय झालेले सदाभाऊ खोत यांची डाळ काही शिजली नाही.
विधानपरिषदेसाठी सदाभाऊ खोत, पंकजा मुंडेंचा पत्ता कट
Legislative CouncilAgrowon

विधानपरिषदेसाठी भाजपने (BJP) पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने प्रवीण दरेकर (Pravin Darekar)आणि प्रसाद लाड (Prasad Lad) यांना पुन्हा संधी दिली आहे. त्याचबरोबर राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे या नव्या नावांचा या यादीत समावेश आहे. पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत या नेत्यांच्या नावाला कात्री लावण्यात आली आहे. शेतकरी प्रश्नावर गेल्या काही दिवसांपासून सक्रिय झालेले सदाभाऊ खोत यांची डाळ काही शिजली नाही. तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय जुळवाजुळव करणाऱ्या आणि पक्षावर नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा डावललं गेलं आहे.

राज्यात २० जून रोजी विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होणार आहेत. ९ जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. भाजपचे राम शिंदे यांचा पराभव २०१९ च्या निवडणूकीत रोहित पवार यांनी पराभव केला होता. तर प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांचा विधानपरिषदेतील कार्यकाळ संपला होता. त्यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे.

भाजप घटक पक्षाला उमेदवारी देईल अशी चर्चा सुरू होती. त्यामध्ये सदाभाऊ खोत यांचे नावही चर्चेत होते. मात्र भाजपने सदाभाऊ खोत यांनाही डावलले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, आज पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाने पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीसाठी आम्ही प्रयत्न केला होता.

पंकजा मुंडे विधानपरिषदेसाठी इच्छुक होत्या. विधानपरिषदेत संधी मिळाली तर तिचं सोनं करू, असं वक्तव्यही त्यांनी केलं होतं. परंतु राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी त्यांना पुन्हा एकदा डावलण्यात आलं आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेची स्थापना केली. त्यावेळी ते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कृषी राज्यमंत्री होते. विधानपरिषदेतील आपला कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा एकदा संधी मिळावी, यासाठी त्यांचा प्रयत्न होता. विधानपरिषदेच्या उमेदवारीवर नजर ठेऊन त्यांनी कृषी कायदे, उसाची एफआरपी, कांदा दरातील घसरण आदी विषयांवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलनं केली. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सोबत एसटी कर्मचारी आंदोलन आणि धनगर आरक्षण आंदोलनात सहभाग घेतला. परंतु त्यांना पुन्हा एकदा विधानपरिषदेच्या आमदारकीची लॉटरी लागू शकली नाही.

दरम्यान, शिवसेना ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांच्या ऐवजी दुसऱ्या उमेदवाराला संधी देण्याची शक्यता आहे. तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या ऐवजी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी मोलाची कामगिरी बजावलेले सचिन अहीर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com