
पुणे : बंगालचा उपसागरात (Bay Of Bengal) गुरुवारी (ता. ८) ‘मनडूस’ चक्रीवादळाची (Mandous Cyclone) निर्मिती झाली आहे. वायव्य दिशेकडे सरकत असलेली ही वादळी प्रणाली आज (ता. ९) मध्य रात्रीपर्यंत पूर्व किनाऱ्यावरील पदुच्चेरी ते श्रीहरीकोट्टा दरम्यान किनाऱ्याला धडकणार आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह (Cloudy Weather) पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे.
बंगालच्या उपसागरात अंदमान समुद्राजवळ तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून ‘मनडूस’ चक्रीवादळ तयार झाले आहे. गुरुवारी (ता. ८) दुपारी ही प्रणाली कारईकलपासून आग्नेयेकडे ४६० किलोमीटर, तर चेन्नईपासून ५५० किलोमीटर आग्नेयेकडे होती.
समुद्रात ताशी ८० ते १०० किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहणाऱ्या वादळाचे केंद्र ताशी ११ किमी वेगाने वायव्य दिशेकडे सरकत होते. चक्रीवादळामुळे तमिळनाडू, आंध्र प्रदेशसह, श्रीलंकेत ढगांची दाटी झाली आहे.
या भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. कर्नाटक, केरळ, महाराष्ट्रासह विविध राज्यांत ढग जमा होत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.