Rabi Season : गिरणा पट्ट्यात दादर, हरभरा पेरणीस वेग

तालुक्यातील भातखंडे बुद्रुकसह गिरणा पट्ट्यात शेतकरी रब्बी हंगामात दादरच्या पेरणीत व्यस्त असल्याचे चित्र आहे. या परिसरात दादरची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात येते.
Rabi Season
Rabi SeasonAgrowon

भडगाव, जि. जळगाव : तालुक्यातील भातखंडे बुद्रुकसह गिरणा पट्ट्यात शेतकरी (Farmer) रब्बी हंगामात (Rabi Season) दादरच्या पेरणीत व्यस्त असल्याचे चित्र आहे. या परिसरात दादरची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात येते.

Rabi Season
Crop Insurance : मंत्री सावे यांनी पीक विमा कंपन्यांना दिला इशारा | ॲग्रोवन

गावराण दादरसह सुधारित व संकरित वाणांची पेरणी करण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसून येत आहे. भातखंडे भागात सेंद्रिय पद्धतीने उत्पन्न होणारी दादर खाण्यासाठी चवदार असल्याने विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी शेतकरी कोरडी दादर शेतकऱ्यांकडून विनापाणी भरलेली दादर घरबसल्या विकत घेत असतात. चवीला उत्तम असलेल्या या दादरची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र दिवसेंदिवस गावरान दादरच्या क्षेत्रात घट होत आहे.

दरम्यान, मागील काही वर्षांपासून विविध कंपन्यांनी विकसित केलेले संकरित दादर वाणाची पेरणी शेतकरी करीत आहेत. या संकरित वाणातून उत्पानाची हमी असते. मात्र चवीला तेवढी खास नसते. दरम्यान, दिवसेंदिवस उत्पन्नाच्या भरवशावर संकरित वाणाची पेरणी क्षेत्रात वाढ होत असल्याने गावरान वाण लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.

Rabi Season
Tanpure Sugar Mill : राहुरीचा ‘तनपुरे कारखाना’ जिल्हा बँकेच्या ताब्यात

दादर पिकाची पेरणीसाठी १५ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबरचा कालावधी चांगला असतो. यंदा तालुक्यात परतीचा पाऊस लांबल्याने दादर, हरभरा पेरणी उशिरा सुरू झाली. प्रमाणित बियाणे वितरण कार्यक्रमांतर्गत गहू व हरभरा पिकाचे फुले विक्रम व राज विजय वाणाचे बियाणे अनुदानित तत्त्वावर भडगाव फ्रूटसेल सोसायटी येथे उपब्लध आहे. शेतकऱ्यांनी ७/१२ व आधार कार्ड देऊन परमीटवर बियाणे उचल करून लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

सर्वाधिक क्षेत्र हरभऱ्याचे

दादर १६८१ हेक्टर, गहू १०७४ हेक्टर, मका २५६२ हेक्टर, हरभरा ३०९१ हेक्टर, सूर्यफूल १५ हेक्टर असे एकूण ८८७२ हेक्टर रब्बी सर्वसाधारण क्षेत्र असून, त्यापैकी ५० टक्क्यांपर्यंत पेरणी झालेली असून, उर्वरित क्षेत्रावर पेरणी सुरू आहे, अशी माहिती भडगाव तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोर्डे यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com