Jowar Fodder : दादर ज्वारीच्या कडब्यास पाच हजार रुपयांवर दर

Jowar Market : खानदेशात दादर ज्वारीच्या कडब्याची आवक बऱ्यापैकी आहे. पण उठाव असल्याने दरही पाच हजार ते साडेपाच हजार रुपये प्रतिशेकडा, असे स्थिर आहेत.
Jowar Fodder
Jowar FodderAgrowon

Jalgaon Market News : खानदेशात दादर ज्वारीच्या कडब्याची (Dadar Jowar Fodder) आवक बऱ्यापैकी आहे. पण उठाव असल्याने दरही पाच हजार (Fodder Rate) ते साडेपाच हजार रुपये प्रतिशेकडा, असे स्थिर आहेत. मका, बाजरी, संकरित ज्वारी आदींचा कडबा अद्याप तयार झाला नसल्याची स्थिती आहे.

मका, बाजरी, संकरित ज्वारीची कापणी पुढील १५ ते २० दिवसांत सुरू होईल. बाजरीची कापणी एप्रिलअखेर होईल. सध्या दादर ज्वारीचा कडबा मुबलक आहे. त्याची थेट किंवा शिवार खरेदी खरेदीदार करीत आहेत.

मध्य प्रदेश, गुजरात, पश्‍चिम विदर्भातील दूध उत्पादक, व्यापारी दादर कडब्यासाठी खानदेशात येत आहेत. रोज २० ते २२ ट्रक (एक ट्रक १२ टन क्षमता) कडब्याची खरेदी केली जात आहे. दर्जेदार कडबा असल्याने दर चांगले आहेत. जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा, अमळनेर, भडगाव, पाचोरा भागांतून दादर ज्वारीचा कडबा खरेदी सुरू आहे.

Jowar Fodder
Jowar Harvesting : शिवारात रब्बी ज्वारी काढणीची लगबग वाढली

धुळ्यात शिंदखेडा व शिरपूर भागांत, नंदुरबारात नंदुरबार, शहादा तालुक्यात काही गावांत दादर ज्वारीचा कडबा उपलब्ध आहे. अनेक शेतकऱ्यांनीदेखील विक्री करून उर्वरित कडब्याची कुट्टी करून त्याची साठवणूक केली आहे.

Jowar Fodder
Jowar Crop variety : ज्वारीच्या तब्बल २५ हजार वाणांचा संग्रह

यंदा ५०० ते ७०० रुपयांनी जास्त दर

मागील वर्षाच्या तुलनेत दादर ज्वारीच्या कडब्याचे दर ५०० ते ७०० रुपये शेकड्यामागे अधिक आहेत. एका एकरात १५० ते १७५ पेंढ्या मिळत आहेत. यातच १४ ते १६ फूट उंचीच्या कडब्याचे दर प्रतिशेकडा सहा हजार रुपयांपर्यंत आहेत.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, रावेर, जळगाव भागांतील दूध उत्पादकांकडूनही कडब्यास उठाव आहे.

चाऱ्याची मागणी पावसाळ्यापर्यंत

जळगावमधील पारोळा, अमळनेर, चाळीसगाव, धुळ्यातील धुळे, शिंदखेडा, नंदुरबारमधील नंदुरबार, नवापूर आदी भागांतील कोरडवाहू पट्ट्यात दादर ज्वारीच्या कडब्याला अधिक मागणी आहे. कारण या भागात चाऱ्याचे उत्पादन कमी असते. तसेच मका, बाजरी आदी पिकेही या भागांत नाहीत. या भागात चाऱ्याची मागणी पावसाळ्यापर्यंत राहील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com