Khandesh Rain Update : खानदेशात काही भागांत रोजच पाऊस

खानदेशात मागील तीन दिवसांपासून रोज दुपारी पाऊस येत आहे. यामुळे शेतीकामांत व्यत्यय येत आहे. कापूस वेचणी, पूर्वमशागतीचा खोळंबा होत आहे.
Rain Update
Rain Update Agrowon

जळगाव ः खानदेशात मागील तीन दिवसांपासून रोज दुपारी पाऊस (Khandesh Rain Update) येत आहे. यामुळे शेतीकामांत व्यत्यय (Agriculture work) येत आहे. कापूस वेचणी (Cotton Picking), पूर्वमशागतीचा खोळंबा होत आहे.

मध्यंतरी तीन दिवस पाऊस नव्हता. सुरुवातीचा एक दिवस कोरडा गेल्यानंतर लागलीच कापूस वेचणी, तणनियंत्रण, उडीद काढणी, फवारण्या, केळी, कलिंगडाची काढणी सुरू झाली. परंतु मागील तीन दिवसांपासून रोज दुपारी पाऊस येत आहे. पावसाची गरज नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कारण आता ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मका आदी पिके मळणीवर आहेत. काही भागांत उडदाची काढणी सुरू आहे.

Rain Update
Crop Damage : दौंडमधील पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

तसेच पूर्वहंगामी कापूस पिकात वेचणी सुरू आहे. कापूस वेचणीसाठी मजूर नसल्याने एक-दोन दिवस वेचणीसाठी मजुरांची प्रतीक्षा करावी लागत आहे. यातच पाऊस येत असल्याने वेचणीचे काम लांबणीवर पडत आहे. कापसाचा दर्जा घसरत आहे. शेतकरी चिंतेत आहेत.

काही भागांत जोरदार, तर काही भागांत मध्यम पाऊस येत आहे. धरणगाव तालुक्यातील लाडली, चोरगाव, चांदसर, जळगावमधील किनोद व लगत सलग दोन दिवस पाऊस झाला आहे. या भागात कापूस पिकाची हानी झाली आहे. तसेच शेतरस्ते खराब झाले असून, शेतीकामांत व्यत्यय आला आहे.

Rain Update
Crop Damage : जोरदार पावसाने जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान

सकाळी ऊन पडते. हवाही खेळती असते. परंतु दुपारी १२ नंतर उकाडा वाढतो. ऊन तापते. दुपारी तीन नंतर पावसाचे आगमन होते. रात्री उकाडा असतो. या विषम वातावरणामुळे केळी, भाजीपाला पिकांचेही नुकसान होत आहे. कारण स्वच्छ, सूर्यप्रकाशीत वातावरण हवे आहे.

मध्यंतरी सलग १३ दिवस जोरदार, अतिजोरदार पाऊस अनेक भागात झाला. नदी -नाल्यांना पूर आला. यानंतर कोरडवाहू कापूस पिकाच्या वाढीसाठी कोरडे वातावरण हवे आहे. काळ्या कसदार जमिनीत वाफसाच नाही. हा वाफसा होण्यासाठी सूर्यप्रकाशीत वातावरण आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

वाफसा झाल्यानंतर कापूस पिकाची चांगली वाढ होईल. अनेक शेतकऱ्यांचे कापूस पीक पिवळे, लाल पडत आहे. त्याची वाढ एक ते दीड फूट एवढीच आहे. त्याच्या वाढीसाठी शेतकरी नॅनो युरिया व इतर संप्रेरके, कीडनाशकांच्या फवारण्या घेत आहेत. त्यासाठी अधिकचा खर्चही करावा लागत आहे.

खानदेशातील या भागात रोजचाच पाउस

जळगाव जिल्ह्यात धरणगाव, चोपडा, जळगाव, यावल, धुळ्यातील धुळे, शिरपूर या भागांत पाऊस हजेरी लावत आहे. दोन दिवसांपूर्वी धुळे तालुक्यातील काही गावांत ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामुळे पिकांची अतोनात हानी झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com