Dairy Business : तरुणांनी धरली दुग्धव्यवसायाची कास

जाेडधंद्यामुळे शेतीला आधार; खेडोपाडी नव्‍या अर्थकारणाला गती
Dairy Business
Dairy BusinessAgrowon

न्हवली, जि. ठाणे ः गेल्‍या काही वर्षांत निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसायात अनेकदा तोटाच पदरी पडतो. गाव-खेड्यावर दुग्ध व्यवसायास (Dairy Business) अनुकूल वातावरण असल्याने अनेक तरुणांनी शहरातील नोकरीधंद्याच्या मागे न लागता दुग्धव्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले आहे. दुग्‍धोत्‍पादनासाठी सरकारच्या अनेक योजनाही उपलब्ध असल्याने आता या व्यवसायाला बरकत आली आहे.

Dairy Business
Dairy Business : विक्रमगडमध्ये दुग्ध व्यवसायाकडे वाढता कल

शेती हाच महाराष्ट्रातील मुख्य व्यवसाय असून ग्रामीण भागातील शेकडो कुटुंब यावर अवलंबून असतात. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीही तोट्यात जाऊ लागल्याने पूरक व्यवसायाची गरज म्हणून पशुपालनाच्या व्यवसायाला महत्त्व आले आहे. सुरुवातीच्या काळात शेतीला दुग्धव्यवसाय हा जोडधंदा असेच स्वरूप होते. मात्र, गेल्या काही दशकांत दुग्धव्यवसाय विस्तारला. हा व्यवसाय आता मुख्य व्यवसाय बनला आहे. दुग्‍धोत्‍पादन हा खेडोपाडी आर्थिक उत्पन्नाचा प्रमुख स्रोत बनला आहे. शेती व्यवसाय करणे परवडत नसल्याने शेतीला जोडधंदा म्हणून या भागातील शेतकरी पशुपालनास पसंती देत आहेत. यंदा जूनपासूनच पावसाचे प्रमाण चांगले असल्याने नदी, नाले, तलाव, विहिरींमध्ये चांगल्या प्रमाणात पाणी आहे.

Dairy Business
Dairy Business : दुग्ध व्यवसायातून तुजारपूर गावाने साधली प्रगती

पशुधनात वाढ

अनेक दुग्धउत्पादक शेतकऱ्यांकडे देशी म्हैशीची पैदास मोठ्या प्रमाणात असली तरी आता नवीन व्यावसायिकांचा मात्र सुरती, मुऱ्हा, जाफराबादी, पंढरपुरी, म्हैसाणा अशा संकरीत किंवा परराज्यातील म्हैशी खरेदी करण्याकडे जास्त कल आहे. मागील महिन्यात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव काही जनावरांना झाला होता. त्यामुळे येथील शेतकरी अडचणीत सापडले होते; परंतु आता या रोगाचा प्रादुर्भाव तितका राहिला नसल्याने तालुक्यात पशुधनाची संख्या वाढू लागली आहे.

चारा-पाण्याचा प्रश्न संपुष्टात

बेरोजगारीचे प्रमाणवाढल्याने शहापूर तालुक्यातील बहुतांश तरुण जोड व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाकडे वळले आहेत. यंदा पाऊस चांगला झाल्याने पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे. त्यामुळे पशुपालकांतून समाधान व्यक्त होत आहे.

पूर्वी दूध विकण्यासाठी शहराकडे जावे लागत असल्याने ते अत्यंत खर्चिक होते. वेळही वाया जायचा. आता ग्रामीण भागात दूधसंकलन केंद्रे झाली असून, दुधाच्या दर्जानुसार भाव चांगला मिळत असल्याने दुग्धव्यवसाय परवडतो.- जितेंद्र दवणे, दुग्ध उत्पादक शेतकरी, सावरोली (सो)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com