Dalmia Sugar Factory : दालमिया शुगर कारखान्याचे परदेशी पाहुण्यांकडून कौतुक

गेल्या वर्षभरात ऊस विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या प्रात्यक्षिक प्लॉटच्या माध्यमातून बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मोफत सल्ला, मातीच्या आरोग्यासाठी गांडूळ खतनिर्मिती धडे देत आहे.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon

कोकरूड, जि. सांगली ः नैसर्गिक साधनांचा वापर करून कमीत कमी क्षेत्रामध्ये योग्य तंत्रज्ञानाच्या आधारे अधिकाधिक ऊस उत्पादन (Sugarcane production) घेता यावे, यासाठी दालमिया भारत शुगर, निनाईदेवी युनिट व सॉलिडरिडॅड आशिया यांच्यामार्फत बायर फूड चेन संस्थेच्या सहकार्याने वर्षभरापासून सुरू असलेल्या ‘पुनर्विकसित शेती व शाश्वत ऊसविकास’च्या कामाची पाहणीसाठी नेदरलँडहून ग्लोबल कम्युनिकेशन हेड एलसा स्कॉलट (Global Communications Head Elsa Scholat from the Netherlands) आल्या होत्या.

निनाईदेवी युनिटचे प्रमुख संतोष कुंभार, सॉलिडरिडॅडचे डॉ. आर. पी. सिंग, डॉ. आलोक पांडे, कृतिका बॅनर्जी, ‘बायर’चे गणेश साळुंखे, तज्ज्ञ ऊस सल्लागार डॉ. आबासाहेब साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत माळेवाडी (ता. शिराळा) येथे ऊस पीक परिसंवाद आयोजित केला होता.

याप्रसंगी मनीषा शाह, माळेवाडीच्या सरपंच सुरेखा चाळके, केन डेव्हलपमेंट युवराज चव्हाण उपस्थित होते. डालमिया भारत शुगर व सॉलिडरिडॅड शेतकऱ्यांप्रती जपत असलेल्या सामाजिक बांधिलकीचे एलसा स्कॉलट यांनी मुक्तकंठाने कौतुक केले.

या कार्यक्रमाद्वारे डोंगरी भागाच्या विकासाची जागतिक पातळीवर नोंद होईल, असा आशावाद व्यक्त केला.

Sugar Factory
Sugar Industry : उद्योग समृद्ध उत्पादकांचे काय?

कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सॉलिडरिडॅडचे किशोर लेंगरे, संजय पाटील, तानाजी जाधव व शेती विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

संतोष कुंभार म्हणाले, की गेल्या वर्षभरात ऊस विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या प्रात्यक्षिक प्लॉटच्या माध्यमातून बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मोफत सल्ला, मातीच्या आरोग्यासाठी गांडूळ खतनिर्मिती धडे देत आहे.

व्हीएसआय येथे शेतकरी प्रशिक्षण, हरित ऊर्जेसाठी बायोगॅसनिर्मिती, कार्यक्षम पाणी वापर या कामांची मांडणी केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com