Kolhapur Rain : कोल्हापुरातील धरणे ५० टक्के भरली

धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे धरणांच्या पाण्याच्या पातळीत वाढ सुरू आहे.
Kolhapur Rain Updates | Kolhapur News
Kolhapur Rain Updates | Kolhapur NewsAgrowon

Kolhapur Rain Updates: जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू असली तरी नद्यांच्या पाणीपातळीत (River Level Increased In Kolhapur) वाढ सुरूच आहे. धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे धरणांच्या पाण्याच्या पातळीत वाढ सुरू आहे. अजूनही जिल्ह्यातील कोणत्याही धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात नसल्याची स्थिती आहे. ताशी धरणातून १००० क्युसेकच्या आसपास पाणी सोडले जात आहे. विविध नद्यांवरील ४५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत गगनबावड्यात सर्वाधिक १११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. (Kolhapur News)

Kolhapur Rain Updates | Kolhapur News
पूर, भूस्खलनामुळे आसाममध्ये १ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

पंचगंगा वारणासह अन्य छोट्या नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. त्यामुळे नदीकाठची जमीन पाण्याखाली गेली आहे. कृष्णा नदीच्या पाण्यातही मोठ्या प्रमाणात वाढ सुरू असून, नदी दुथडी भरून वाहत आहे. कोणत्याही गावांचा पूर्ण संपर्क तुटलेला नाही, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

Kolhapur Rain Updates | Kolhapur News
कोल्हापूर जिल्ह्यात एक लाखावर शेतकरी वीजबिल थकबाकीमुक्त

अतिवृष्टीचा इशारा कायम असल्याने नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नदीकाठच्या जमिनी पाण्याखाली गेल्याने विशेषतः चाऱ्यासाठीच्या गवताचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना चाऱ्याची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

घटप्रभा, जांबरे, कोदे प्रकल्प १०० टक्के भरले

पंचगंगा नदीची पातळी मंगळवारी (ता. १२) दुपारी १२ पर्यंत ३३ फूट १० इंच होती. या ठिकाणी इशारा पातळी ३९ फूट आहे. राधानगरी धरण ५४ टक्के भरले आहे. वीजनिर्मितीसाठी १३५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तुळशी प्रकल्प ५२ टक्के भरला असून धरणातून अद्याप विसर्ग सुरू नाही. वारणा प्रकल्पातून ७६५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून धरण ५२ टक्के भरले आहे. दूधगंगा प्रकल्प ४४ टक्के भरला आहे. या प्रकल्पातून ६५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. घटप्रभा, जांबरे, कोदे आदी लघू प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com