Agriculture Department : कोल्हापुरात ‘कृषी’चे ‘डॅमेज कंट्रोल’

प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी कार्यालयातच ठाण मांडून सूक्ष्म सिंचन योजनेची सुमारे दीड कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली.
Department Of Agriculture
Department Of AgricultureAgrowon

Agriculture Scheme Fund कोल्हापूर : येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात विस्कळितपणामुळे शेतकऱ्यांना निधी वेळेत मिळत नसल्याबाबतचे वृत्त ‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्या दिवसापासूनच कार्यालयाच्या कामकाजात मोठी सुधारणा दिसून आली.

प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी कार्यालयातच ठाण मांडून सूक्ष्म सिंचन योजनेची सुमारे दीड कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली.

सोमवारी (ता. ३० जानेवारी) याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच कार्यालय खडबडून जागे झाले. त्याच दिवशी पांगरे यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन प्रलंबित कामांचा आढावा घेतला.

Department Of Agriculture
Agriculture Department : कृषी विभागाच्या ‘निष्क्रियते’मुळे निधी परत जाण्याची शक्यता

कुणामुळे निधी थांबला याची चर्चा न करता पुढील काळात शेतकऱ्यांना वेळेवर रकमा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. याबरोबरच सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेत हजर राहण्याचेही पत्र काढले.

पांगरे यांनी युद्ध पातळीवर मोहीम राबवत तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून प्रलंबित कामांची माहिती घेऊन तातडीने अहवाल सादर करण्याच्या सक्त सूचना दिल्या.

Department Of Agriculture
Micro Irrigation : सूक्ष्म सिंचनासाठी १३० कोटी उपलब्ध

दरम्यान, तालुका कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. अनुपस्थित राहिलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली.

गेल्या काही महिन्यात अनेक कर्मचारी वेळेत उपस्थित नसल्याने अनेक कामे प्रलंबित होती. ‘ॲग्रोवन’च्या दणक्यानंतर या कामांना गती मिळणार आहे.

पांगरे यांनी बैठकांचा धडाका लावला असून त्यांच्या पातळीवरील प्रलंबित कामे झपाट्याने निपटारा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

यामुळे कामाच्या पातळीवर सकारात्मकता आल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना तातडीने निधी प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांकडून ‘ॲग्रोवन’चे कौतुक होत आहे.

‘संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करा’

कार्यालयामध्ये काही कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचे चित्र अजून काही प्रमाणात सुरू आहे. निधी परत जाण्याची वेळ का आली?

याबाबत किंवा निधी त्या त्या वेळी का निर्गत होत नाही, याबाबतची विचारणा 'ॲग्रोवन'ने कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांना केली असता संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांच्या अडेलतट्टूपणामुळे अडथळे येत असल्याचेही सांगण्यात आले.

आयुक्तालयाने या बाबत तातडीने चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

शेतकऱ्यांची कामे प्रलंबित राहणार नाहीत, याबाबत गतीने कामकाज सुरू केले आहे. अधिकाऱ्यापासून ते कृषी सहाय्यकापर्यंत कोणत्याही पातळीवर कामे प्रलंबित न ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी वेळेत हजर व्हावे, या साठी बायोमेट्रिक पद्धत ही लवकरच अवलंबणार आहोत.

- जालिंदर पांगरे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com