देऊळगावराजा तालुक्यातील पाझर तलाव फुटल्याने नुकसान

यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाला. दोन दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या सदर तलावाच्या सांडव्यात अडथळा निर्माण झाला.
Crop Damage
Crop DamageAgrowon

देऊळगावराजा, जि. बुलडाणा ः तालुक्यातील निमखेड गिरोली बुद्रुक शिवारात असलेला जिल्हा परिषद सिंचन विभागाचा (Irrigation Department) पाझर तलाव (Pazar Lake Burst) गुरुवारी (ता. ८) अचानक फुटल्याने या तलावाखालील भागात असलेल्या शेकडो एकरातील पिकांचे अतोनात नुकसान (Crop Damage) झाले. क्षमतेपेक्षा अधिक साठा झाल्याने तलावाच्या भिंतीला भगदाड पडले. पाझर बुजविण्याचे प्रयत्न सुरू असताना हा तलाव फुटला.

Crop Damage
Crop Damage : सव्वासात लाख हेक्टरला फटका

यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाला. दोन दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या सदर तलावाच्या सांडव्यात अडथळा निर्माण झाला. गुरुवारी (ता. ८) सकाळपासूनच तलावातून पाझर सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जेसीबीद्वारे पाझर बुजविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले.

मात्र, हे काम सुरू असताना दुपारनंतर मोठे भगदाड पडून तलावाची भिंत फुटली. तलाव फुटल्याने परिसरातील शेकडो एकरांमधील कपाशी, सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. तर काही शेतकऱ्यांची शेतजमीन खरडून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. या तलावाच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे उगवली होती. ती तोडण्यातही आली होती. यामुळे झाडांच्या मुळांमुळे पाणी पाझरून तलाव फुटल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शेत नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यात येईल, अशी माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com