Rain Update : अकोला, बाळापूरमध्ये १२६५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान

पेरणी केलेली शेतीही खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे बाळापूर तालुक्यातील अनेक गावांतील नदी-नाले, ओढ्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने शेतात पाणी शिरले व शेती खरडून गेली.
Heavy Rain Akola
Heavy Rain Akola Agrowon

अकोला : दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain In Akola) अकोला व बाळापूर या तालुक्यात सुमारे १२६५ हेक्टर क्षेत्रावरील (Agriculture Land) पिकांना फटका (Crop Damage) बसला आहे. याबाबत प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे.

जिल्ह्यात अकोला व बाळापूर तालुक्यात सोमवारी (ता.२७) रात्री झालेल्या जोरदार पाऊस झाला होता. जिल्ह्यात प्रामुख्याने कंचनपूर, बादलापूर, मांजरी, मोरगाव भाकरे, खंडाळा या गावांमध्ये मोठे नुकसान झाले. अकोला तालुक्यात १० घरांची अंशतः पडझड झाली. अकोला तालुक्यात ८५० हेक्टर तर बाळापूर तालुक्यात ४१५ हेक्टर अशा १२६५ हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, तूर पिकांचे नुकसान झाले. मांजरी ते अकोला हा रस्ता खचला असून मांजरी गावाला जोडणारा पूल वाहून गेला आहे. तर हातरुण- कंचनपूर या रस्त्याचेही पावसामुळे नुकसान झाले.

Heavy Rain Akola
कोकणात पावसाचा जोर कायम

पेरणी केलेली शेतीही खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे बाळापूर तालुक्यातील अनेक गावांतील नदी-नाले, ओढ्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने शेतात पाणी शिरले व शेती खरडून गेली. काही ठिकाणी पेरणी केलेले बियाणेही वाहून गेले. बाळापूर तालुक्यातील हातरूण, शिंगोली, मालवाडा परिसरात जोरदार पाऊस झाल्याने नदी काठच्या शेतात पाणी शिरल्याने शेतजमीन खरडून गेली.

गेल्या वर्षी २१ जुलैला ढगफुटी सदृश पावसामुळे मांजरी गावाजवळच्या पुलावरील भराव वाहून गेल्याने संपर्क तुटला होता. त्याचीच पुनरावृत्ती सोमवारी झाली. नागरिकांना दळणवळणासाठी मोठ्या कसरती कराव्या लागत आहेत. प्रशासनाने तातडीने नादुरुस्त झालेला रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com