Crop Damage : आठवडाभरात ५० हजार हेक्टर सोयाबीनवर पाणी

बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती; नुकसानवाढीची शक्यता
Crop Damage
Crop DamageAgrowon

बुलडाणा ः जिल्ह्यात खरिपाचे प्रमुख पीक (Kharip Crop) असलेल्या सोयाबीनचा हंगाम (Soybean Season) हातातोंडाशी आला असताना सतत पाऊस (Heavy Rainfall) होत आहे. त्यामुळे हजारो हेक्टरवरील पिकांवर पाणी फिरले आहे. १० ऑक्टोबरपासून आतापर्यंत आठवडाभरात किमान ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार १४ ऑक्टोबरपर्यंत ३१ हजार हेक्टरपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यानंतरही पाऊस सुरू असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.

Crop Damage
Crop Insurance : ‘प्रोत्साहन’ आज जमा

जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीनची सुमारे साडेतीन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा पिकाची स्थिती चांगली होती. उत्पादकता वाढेल, असे चित्र होते. परंतु सततच्या पावसाने हे स्वप्न धुळीस मिळविले आहे. सोयाबीनची काढणी सुरू असतानाच पुन्हा एकदा पावसाने धुमाकूळ घातला. जिल्ह्यात ८ ते १० ऑक्टोबरदरम्यान मेहकर, लोणार तालुक्यांत अतिवृष्टीचा तडाखा बसला. मेहकर ११०३५ तर लोणारमध्ये ८०३० हेक्टरवर सोयाबीन, तूर, उडीद, भाजीपाल्याचे नुकसान झाले.

दरम्यान, १० ते १२ दरम्यान पुन्हा मेहकर तालुक्यात अतिवृष्टी होऊन ११ हजार हेक्टर, चिखली २०७, सिंदखेडराजा ८२० हेक्टर पिकांचे नुकसान झाले. त्यानंतरही आतापर्यंत पाऊस होतच आहे. बुधवारी (ता.१९) सकाळी जिल्ह्यात बुलडाणा, मेहकर व इतर भागांत पुन्हा पावसाने जोरदार तडाखा दिला. त्यामुळे सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. कृषी, महसूल, ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पंचनामे सुरू आहेत. पाऊस होत असल्याचा फटका या कामालाही बसत आहे.

बुलेट्स

चोहोबाजूंनी असा शेतकरी भरडला

- सोयाबीन सोंगणीला विलंब

- दाण्यांमधून कोंब अंकुरने सुरू

- सोयाबीन पाण्यात असल्याने दर्जा खालावला

- दररोजच्या पावसाने कामे ठप्प

- भिजलेल्या सोयाबीनला सुकवण्याची कसरत

- बाजारात दर कमी

- २५ टक्के लागवडीला फटका

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com