Crop Damage : अतिवृष्टीमुळे १.१५ लाख हेक्टरवर नुकसान

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात आठ व नऊ ऑगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मूग, तूर आदी पिकांचे सुमारे एक लाख १५ हजार ७७९ हेक्टरवर नुकसान झाले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

वाशीम : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात आठ व नऊ ऑगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) सोयाबीन (Soybean), मूग, तूर (Tur) आदी पिकांचे सुमारे एक लाख १५ हजार ७७९ हेक्टरवर नुकसान (Crop Damage Due To Heavy Rain) झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान मालेगाव तालुक्यात ४७ हजार ४३२ हेक्टरवर असल्याचा प्राथमिक अंदाज यंत्रणांनी व्यक्त केला आहे. शासनाने तातडीने नुकसानग्रस्तांना भरपाई (Compensation) देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

Crop Damage
Rain : धरणांतून विसर्गात वाढ

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात संततधार पाऊस झाला. अनेक मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने पिके पाण्याखाली आली होती. पिके सतत पाण्यात राहिल्याने नुकसान झाले. याबाबत यंत्रणांनी नुकसानीचा अंदाज घेत विभागीय आयुक्तांकडे अहवाल पाठवला आहे. यानुसार वाशीम जिल्ह्यात आठ व नऊ ऑगस्ट रोजी संततधार पाऊस झाल्याने तसेच अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आले. सतत आलेल्या पावसामुळे पिकांमध्ये पाणी साचले.

Crop Damage
Soybean : देशात ४० लाख टन सोयाबीन शिल्लक?

या आपत्तींमुळे प्रामुख्याने सोयाबीन, मूग , तूर व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले. प्रशासनाने तयार केलेल्या प्राथमिक अहवालानुसार वाशीम तालुक्यात २८ हजार ८७८, मालेगाव तालुक्यात ४७ हजार ४३२, रिसोडमध्ये ६४१४, मंगरूळपीर तालुक्यात १७४६९, मानोरा तालुक्यात ८७५ हेक्टर आणि कारंजा तालुक्यात १४६५० हेक्टरवर पिके बाधित झाल्याचे म्हटले आहे. याबाबतचा अंतिम अहवाल एकत्रित पंचनामे केल्यानंतर तयार होणार आहे. सध्याही पावसाचा जोर कायम असल्याने पीक नुकसानीचा आकडा याहीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मालेगावमध्ये ओल्या दुष्काळाची मागणी

जऊळका रेल्वे ः मालेगाव तालुक्यात चार ते आठ ऑगस्ट दरम्यान झालेल्या जोरदार पाऊस झाल्याने तालुक्यात अनेक नदी नाल्यांना पूर आले. अनेक गावांचा संपर्क तुटला होता. नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्या असून समृद्धी महामार्गालगतच्या शेतात समृद्धीचा भराव वाहून आल्याने पिके वाहून गेली. अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्यात असून पिवळी पडली. अतिवृष्टीने शेतीचे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्याला शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी. मालेगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी केली जात आहे.

जिल्ह्यात या हंगामात मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल बनला आहे. पाऊस सुरू असल्याने दररोज नुकसान वाढत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्ह्यात सर्वत्र रस्त्यावर उतरेल.
दामोदर इंगोले, विदर्भ अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वाशीम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com