Crop Damage : पिके, फळबागांचे अतिवृष्टीमुळे नुकसान

पुरंदर तालुक्यात या वर्षी पावसाळा उशिरा सुरू झाला. खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. त्यातूनही शेतकऱ्यांनी धडपड करून पिके घेतली. परंतु जास्त पावसाने पूर्णपणे ती उध्वस्त झाली आहेत.
Crop Damage
Crop DamageAgrowon

सासवड ः पुरंदर तालुक्यात या वर्षी पावसाळा (Monsoon Rain) उशिरा सुरू झाला. खरीप हंगाम (Kharif Season) पूर्णपणे वाया गेला आहे. त्यातूनही शेतकऱ्यांनी धडपड करून पिके घेतली. परंतु जास्त पावसाने पूर्णपणे ती उध्वस्त (Crop Damage Due To Heavy Rain) झाली आहेत. आता रब्बी हंगाम (Rabi season) तोंडावर आला असताना त्याचीही धास्ती लागली आहे. बाजरी (Millet), भुईमूग (Groundnut), वाटाणा, घेवडा यांसह तरकारी पिकांचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले आहे.

Crop Damage
Crop Damage compensation : अतिवृष्टिग्रस्तांना ३५ कोटी रुपये भरपाई मिळणार

आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शासनाला पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे. मात्र शासन काहीच हालचाल करीत नसल्याने पंचनामे कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले असून शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वनपुरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या उपाध्यक्षा भारती गायकवाड यांच्यासह शेतकऱ्यांनी केली.

Crop Damage
Crop Damage : जोरदार पावसाने पिकांचे ठिकठिकाणी मोठे नुकसान

वाटाणा पिकासह सर्वच पिके पाण्याखाली गेली आहेत. तर मागील दोन दिवसांत झालेल्या जोराच्या पावसाने राहिलेली पिकेही पाण्याखाली गेली आहेत. कशीबशी आलेली बाजरी, घेवडा, भुईमुग, शेतात आताच टाकलेली कांद्याची रोपे नष्ट झाली आहेत. फळ बागांचेही मोठे नुकसान झाले आहे.

‘‘काळदरी परिसरात नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून त्यांना मदत देण्याची कार्यवाही सुरु आहे. इतर भागांत नुकसान झाले असल्यास कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करून पंचनामे करून घ्यावेत. पंचनामे करण्यास सांगितले आहे,’’ असे तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी सांगितले.

काळदरीत भात हेच मुख्य पीक आहे. अतिवृष्टीमुळे भात पीक शेतातच कुजले आहे. तर काही शेतकऱ्यांची भात खाचरेच वाहून गेली आहेत. तसेच शेतांच्या तालींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तहसीलदारांनी पाहणी केली असून पंचनामे पूर्ण केले आहेत.
गणेश जगताप, सरपंच, काळदरी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com