
Solapur News: पाटकुल (ता. मोहोळ) येथे उजनी धरणाचा डावा कालवा (Canal) फुटल्याने परिसरातील शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान (Crop damage) झाले.
आता या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले असून, तहसीलदार प्रशांत बेडसे (Tehsildar Prashant Bedse) यांनी बारा जणांची चार पथके त्यासाठी नेमली आहेत.
नुकसानीचे हे पंचनामे (Panchnama) तत्काळ करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
रविवारी (ता. २९) पहाटे साडेपाचच्या सुमारास पाटकुल हद्दीतील किलोमीटर ११३ जवळ उजनीचा डावा कालवा अचानक फुटून परिसरातील शेतकऱ्यांच्या द्राक्ष, डाळिंब, केळी, ऊस, गहू आदी पिकांसह शेतीचे मोठे नुकसान झाले.
परिसरातील वस्त्यांवरील काही शेतकऱ्यांच्या घरातही कालव्याचे पाणी शिरले. तसेच जमिनीही खरडून गेल्या आहेत. विद्युत मोटारीही वाहून गेल्या आहेत.
विहिरी गाळाने भरल्या आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar), जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान घटनास्थळावरच परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी शंभरकर यांनी तातडीने पंचनामे करण्याचे तोंडी आदेश दिले होते.
तहसीलदार बेडसे यांनी तातडीने पंचनाम्याचे लेखी आदेश काढले. त्यानुसार सोमवारी (ता. ३०) पंचनाम्यास सुरुवात झाली.
पंचनामे युद्धपातळीवर करून तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचनाही संबंधित पथकाला दिल्या आहेत. एका पथकात ग्रामसेवक, तलाठी व कृषी पर्यवेक्षक अशा तिघांचा समावेश आहे.
अशी बारा जणांची चार पथके तैनात केली आहेत. या पथकावर पेनूर मंडलच्या मंडलाधिकारी श्रीमती सारिका व्हावळ व पेनूर विभागाचे कृषी मंडल अधिकारी जी. एस. भडकवाड यांचे नियंत्रण असणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.