Crop Damage: अतिवृष्टीमुळे पंधरा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) आसना नदीला आलेल्या पुरामुळे कुरुंदा, किन्होळा, टाकळगाव, इंजनगाव, रुंज आदी गावांतील ४०० ते ४५० घरांमध्ये सुमारे पाच फूट पाणी शिरल्याचे कळताच जिल्हा प्रशासनाने तातडीने मदत कार्य करून संबंधित ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

हिंगोलीः हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात शुक्रवारी (ता. ८) रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) कुरुंदा तसेच परिसरातील गावांच्या शिवारातील जमिनी खरडून गेल्या असून सुमारे १५ हजार हेक्टरवरील खरीप पिके, फळपिके, भाजीपाला, बागायती पिकांचे (Crop Damaged Due To Heavy Rain) नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

लहान मोठी मिळून सुमारे शंभर जनावरे दगावली आहेत. शेकडो घरांची पडझड झाली आहे. नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पूरग्रस्त गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली.

Crop Damage
Maharashtra Farmer: महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करू: मुख्यमंत्री

मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) आसना नदीला आलेल्या पुरामुळे कुरुंदा, किन्होळा, टाकळगाव, इंजनगाव, रुंज आदी गावांतील ४०० ते ४५० घरांमध्ये सुमारे पाच फूट पाणी शिरल्याचे कळताच जिल्हा प्रशासनाने तातडीने मदत कार्य करून संबंधित ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.

Crop Damage
Ekanath Shinde : आषाढी एकादशीनंतर मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा करू: शिंदे

पूर परिस्थितीची माहिती मिळताच शनिवारी (ता. ९) पहाटे पाचच्या सुमारास वसमतचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी गावात जाऊन ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविले. कोणतीही जीवित हानी झालेली नाही. परंतु प्राथमिक अंदाजानुसार ५० ते ६० जनावरे, ३० ते ३५ शेळ्या दगावल्याची शक्यता आहे.

नुकसानीबाबतची माहिती घेण्यात येत आहे. संबंधित गावातील पाणी आता पूर्णपणे ओसरले आहे. टाकळगाव येथील दोन शेतकरी, इंजनगाव येथील दोन शेतकरी अशा एकूण चार शेतकऱ्यांना एसडीआरएफच्या पथकाव्दारे बोटीमधून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

रुंज गावातील शेतात अडकलेल्या एका नागरिकांस सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

पुरामुळे दीड एकर जमीन खरडून गेली. अर्धा एकर हळद, एक एकर सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. घरामध्ये पाच फूट पाणी साचले होते. त्यामुळे दोन भिंती पडल्या आहेत.

शिवाजी इंगोले, कुरुंदा, ता. वसमत.

आसना आणि उघडी नद्यांच्या पुरामुळे चार एकरांवरील पेरू आणि करवंदाची बाग उद्ध्वस्त झाली आहे. करवंद काढणीस आले होते. आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

सदाशिव अडकिणे, इंजनगाव

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com