Crop Damage : दोन लाखांवर हेक्टरवरील पिकांचे नुकसान

परभणी जिल्ह्यातील स्थिती; अतिवृष्टीमुळे साडेचार लाखांवर शेतकरी बाधित
 Crop Damage
Crop Damageagrowon
 Crop Damage
Cotton Picking : कापूस वेचणीला झाली सुरुवात

सततच्या पावसामुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २२२ कोटी ३५ लाख २ हजार रुपये आणि अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी ७५ कोटी ६३ लाख २४ हजार रुपये निधी अपेक्षित आहे. नुकसानीची पंचनामे सुरु आहेत. त्यामुळे अहवालात अंशतः बदल होऊ शकतो, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

 Crop Damage
Soybean Rate : सोयाबीन बाजाराला पामतेलाचा आधार

सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यातील सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड,पालम, पूर्णा या ९ तालुक्यातील ६९७ गावातील ३ लाख ६९ हजार ४१ शेतकऱ्यांच्या १ लाख ६३ हजार हेक्टरवरील जिरायती पिकांचे नुकसान झाले. बाधितांच्या मदतीसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० नुसार २२२ कोटी रुपये निधी अपेक्षित आहे. अतिवृष्टीमुळे परभणी, सेलू, पाथरी, पूर्णा या चार तालुक्यांतील ९२ हजार शेतकऱ्यांच्या ५५ हजार ६१२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपये नुसार ७५ कोटी ६३ लाख रुपये निधी मिळणे अपेक्षित आहे.

 Crop Damage
Cotton Picking : कापसाची वेचणी कशी कराल?

सप्टेंबर -ऑक्टोंबर सततच्यामुळे बाधित गावे,

शेतकरी, क्षेत्र (हेक्टरमध्ये) प्राथमिक अहवाल

तालुका पेरणी

क्षेत्र बाधित गावे बाधित शेतकरी बाधित क्षेत्र अपेक्षित निधी (कोटीत)

परभणी ८६४१९ ७७ ३६१४३ २९२७६ ३९.८१

जिंतूर ९८३५५ १७१ ७०३१३ ३४५८८ ४७.०३

सेलू ६१७३१ ७६ १८९२० ४५६२० २५.७३

मानवत ४२४२४ ५३ ३८३२३ १६९२४ २३.०१

पाथरी ३७३८० ४३ २८१५१ १२६५३ १७.२०

सोनपेठ ३२९९० ५२ ३१२३० ११५४६ १५.७०

गंगाखेड ५७५०६ १०५ ५१४१९ १४९०० २०.२६

पालम ४३८९० ८० ४२४०० १३४५३ १८.२९

पूर्णा ५००२८.५३ ४० २५४४२ ११२३२ १५.२७

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकरी, क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका बाधित गावे बाधित शेतकरी बाधित क्षेत्र अपेक्षित निधी

परभणी ५३ ४२३१८ २७३६१ ३७.२१

सेलू १९ ८०५५ ५२०७ ७.०८

पाथरी १३ १०१४३ ७१६२ ९.७४

पूर्णा ५४ ३१८५० १५८८२ २१५९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com