Crop Damage : काढणीला आलेले पीक मिसळले मातीत

काढणीला तयार झालेले सोयाबीन, वेचणीला आलेला कापूस दसऱ्यापासून ठाण मांडून बसलेल्या पावसामुळे मातीत मिसळल्या जाऊ लागला आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

अकोला ः काढणीला तयार झालेले सोयाबीन (Soybean Harvest), वेचणीला आलेला कापूस (Cotton Picking) दसऱ्यापासून ठाण मांडून बसलेल्या पावसामुळे मातीत मिसळल्या (Crop Damage) जाऊ लागला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला हा शेतमाल डोळ्यांसमोर खराब होताना बघावा लागत आहे. सततच्या पावसाने शेतकऱ्यांना शेतमालाला घरी आणणे शक्य राहिलेले नाही.

Crop Damage
Soybean Crop Damage : पावसाचे पुनरागमन सोयाबीनसाठी मारक

बुधवारी (ता. ५) पावसाचे पुनरागमन झाल्यापासून दररोज पाऊस होत आहे. मागील २४ तासांत अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांत काही तालुक्यात पावसाने धुळधाण केली. अकोला जिल्ह्यात उमरा (७८.८ मिलिमीटर), व्याळा मंडलात ६२ मिलिमीटर पाऊस नोंद झाला. वाडेगावमध्ये ४२ मिलिमीटर पाऊस झाला.

बुलडाणा जिल्ह्यात मेहकर, लोणार तालुक्यात पावसाने मोठा तडाखा दिला. ठिकठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. मेहकर १०७.५, नायगाव दत्तापूर १०७.५, सुलतानपूर १०५ मिलिमीटर अशी अतिवृष्टी झाली. तर याच तालुक्यातील हिवरा आश्रम ४१.३, वरवंड ५४.५, हिरडव ५९.६, अंजनी खुर्द ४६.५, लोणार ४२ मिलिमीटर पाऊस झाला. वाशीम जिल्ह्यात रिसोड तालुक्यात सर्वत्र पाऊस झाला. मोप ४६.५, वाकद ४६, गोवर्धन ४३.३ मिलिमीटर पाऊस नोंद झाला.

Crop Damage
Crop Damage : मूग, उडदाची पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली

सध्या सोयाबीनचे पीक काढणीला आलेले आहे. अनेक शेतशिवारात सोयाबीनच्या शेंगा वाळल्या असून या आठवड्यात काढणी करणे गरजेचे होते. मात्र, आता काढणीदरम्यानच पाऊस आल्याने मोठी बिकट स्थिती बनली. सोयाबीनची सोंगणी जुळत नाही. तर सोंगणी केलेले सोयाबीन ओले होत आहे. अनेक ठिकाणी गेल्या चार दिवसांतील सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांना कोंब निघाले.

कपाशीचे नुकसान

सोयाबीन पाठोपाठ कपाशी पिकाचेही नुकसान प्रचंड आहे. प्री-मॉन्सून लागवड असलेल्या शेतांमध्ये कापसाची वेचणी सुरू झालेली आहे. या आठवड्यात वेचणीच होऊ न शकल्याने झाडावर बोंडातून निघालेला कापूस लोंबकळत आहे. शिवाय कापूस ओला झाल्याने पिवळा पडण्याची भीती आहे. यामुळे कापसाच्या दराला फटका सहन करावा लागेल.

शेतरस्त्यांअभावी शेतमालाचे नुकसान

या जिल्ह्यामध्ये वर्षानुवर्षे शेतरस्त्यांचे प्रश्‍न कायम आहेत. या हंगामात सततच्या पावसाने आता शेतापर्यंत बैलगाड्या किंवा कुठलेही वाहन पोचू शकत नाही. जमिनीतील ओलीमुळे व पावसामुळे तयार असलेला शेतमाल घरी आणणेही आता शेतकऱ्यांच्या आवाक्यात राहिलेले नाही. शेतरस्ते असते तर अनेकांनी याही स्थितीत माल घरापर्यंत आणण्याची धडपड केली असती, असे शेतकरी सांगत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com