Onion : कांदा रोपवाटिकांची अतिपावसाने हानी

खानदेशात कांदा रोपवाटिकांची अतिपावसात मोठी हानी झाली आहे.
Onion
OnionAgrowon

जळगाव ः खानदेशात कांदा रोपवाटिकांची (Onion Nursery) अतिपावसात मोठी हानी (Onion Nursery Due To Heavy Rain) झाली आहे. रोपवाटिकांत २० ते २५ टक्के रोपे खराब (Onion Plant Damage) झाली आहेत. पुढे लागवडीवरही याचा परिणाम होणार आहे.

Onion
Onion : सुधारित तंत्राद्वारे केली दर्जेदार कांदा रोपनिर्मिती

यंदा कमी दरामुळे कांदा लागवडीबाबत उदासीनता आहे. यातच बियाण्याचे दर अव्वाच्या सव्वा आहेत. ते १२०० ते २००० रुपये प्रतिकिलो या दराने विक्री केले जात आहे. अनेकांनी हिमतीने रोपवाटिका तयार केल्या. त्यात चांगली उगवणही झाली. कांदा लागवडीची तयारीदेखील अनेक शेतकऱ्यांनी केली. पण सततचा भिज पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे रोपांची हानी झाली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. कारण कांदा लागवडीसाठी क्षेत्र राखीव केले आहे. त्यात मशागतही गेल्या आठवड्यात केली. लागवडीसाठी ठिबकची व्यवस्थादेखील अनेकांनी केली. परंतु मागील दोन-तीन दिवसांमधील पावसाने कांदा रोपे खराब झाली आहेत.

Onion
Onion : कांदाविक्री बंदच्या मुद्द्यांवर शेतकऱ्यांत संभ्रम

खानदेशात सुमारे २५० हेक्टरवर कांदा रोपवाटिका आहेत. जळगाव जिल्ह्यात चोपडा, एरंडोल, धरणगाव, चाळीसगाव, जामनेर, यावल, धुळ्यातील धुळे, शिंदखेडा व साक्री तालुक्यांत अधिकच्या रोपवाटिका आहेत. यंदा सुमारे साडेसात ते आठ हजार हेक्टरवर लागवडीचा अंदाज होता. परंतु अतिपावसाने सर्व अंदाज चुकले आहेत. लागवड कमी होईल. तसेच रोपांचाही तुटवडा राहील, असे सध्या दिसत आहे. अनेक शेतकऱ्यांना लागवडीचे क्षेत्र कमी करावे लागणार आहे.

उत्पादन खर्चात होतेय वाढ

जळगाव जिल्ह्यात चोपडा व यावल भागात पाऊस आणखी सुरूच राहिल्यास रोपवाटिकांमध्ये आणखी नुकसान होईल. तसेच तणही वाढेल. कोवळी रोपे तण व अतिपावसाने तयार झालेल्या समस्यांमुळे हातचे जाईल, अशी स्थिती आहे. नुकसान कमी करण्यासाठी शेतकरी बुरशीनाशके, संप्रेरके आदींचा उपयोग करीत आहेत. तसेच तण काढण्यासह तणनाशकांचाही उपयोग करीत आहेत. यात उत्पादन खर्च वाढत आहे.

कांदा रोपवाटिकांचे नुकसान अतिपावसात सुरूच आहे. पाऊस थांबल्याशिवाय नुकसान थांबणार नाही. रोपांचे नुकसान झाल्याने लागवड कमी करावी लागेल. कारण रोपांचा तुटवडाही असेल.

- रमेश पाटील, शेतकरी, भडगाव, जि. जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com