Soybean Crop Damage : ‘हाती येता येता झाली सोयाबीनची माती’

काढणी करायला उसंत दिली नाही आणि हाती येता येता डोळ्यांदेखत सोयाबीनची माती झाली. चांगल्या दराची आशा होती, पण पीकच पदरात पडलं नाही, तर पैसे कशाचे होणार?,’’ अशी व्यथा पावसाने झालेल्या नुकसानीमुळे हतबल झालेल्या नगर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांनी मांडली.
Soybean Crop Damage
Soybean Crop DamageAgrowon

नगर, ः ‘‘येलो मोझॅकच्या (Soybean Yellow Mosaic) तावडीतून वाचलेले सोयाबीन यंदा बऱ्यापैकी जोमात होते. शेंगाही चांगल्या लागल्या होत्या. मात्र महिनाभरापासून सतत पाऊस पडत आहे. आठ दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळला. काढणी (Soybean Harvesting) करायला उसंत दिली नाही आणि हाती येता येता डोळ्यांदेखत सोयाबीनची माती (Soybean Crop Damage) झाली. चांगल्या दराची आशा होती, पण पीकच पदरात पडलं नाही, तर पैसे कशाचे होणार?,’’ अशी व्यथा पावसाने झालेल्या नुकसानीमुळे हतबल झालेल्या नगर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांनी (Soybean Producer Farmer) मांडली.

‘‘तीन वर्षांपासून एन काढणीच्या काळातच सोयाबीन, कापसाचे नुकसान होत आहे. सारी संकट शेतकऱ्यांच्या मुळावरच कशी येतात. सरकार पंचनामे करील, तोडकी-मोडकी मदतही मिळेल, पण झालेले नुकसान भरून न येणारे आहे,’’ अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Soybean Crop Damage
Soybean Rate : सोयाबीन, कांद्याच्या भावात सुधारणा

जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून सारखाच पाऊस पडत आहे. त्यामुळे खरिपातील पिके हातची हिरावली आहेत. जिल्ह्यात गेल्या चार-पाच वर्षांपासून सोयाबीन, कापूस पिकांचे क्षेत्र वाढते आहे. बाजरीचे क्षेत्रही बऱ्यापैकी आहे. मात्र हीच पिके दरवर्षी काढणीच्या काळात संकटात सापडतात. यंदा जिल्ह्यात सोयाबीनचे दीड लाख हेक्टर क्षेत्र आहे. कापसाची १ लाख ३१ हजार हेक्टरवर लागवड झाली. तर बाजरीचे क्षेत्र ९० हजार हेक्टरवर आहे.

राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर तालुक्यांत सोयाबीनचे क्षेत्र अधिक आहे. श्रीरामपूर तालुक्यातील तांबेवाडी, मांडवे, फत्याबाद, गळनिंब, पुरमपूर, उक्कलगाव, पढेगाव, बेलापूर, राहाता तालुक्यातील राजुरी, ममदापूर, यादवमळा, निर्मळ पिंप्री, बाभळेश्वर, कोल्हार, लोणी, केलवड आदी भागांत सोयाबीन, कापसाचे पीक अधिक आहे. या भागातील बहुतांश शेतात गुडघाभर पाणी आहे. त्यातील सोयाबीन काढण्याची धडपड शेतकरी करीत आहेत.

Soybean Crop Damage
Soybean Rate : सोयाबीन दरवाढीच्या मार्गात खाचखळगे

शेतकरी अतुल तांबे म्हणाले, ‘‘दोन आठवड्यांपासून शेतात पाणी साचून राहिले आहे. खरे तर सोयाबीनची मागील आठवड्यातच सोंगणी होणे गरजेचे होते. मात्र पावसाने काढणीच करता आली नाही. आता दाण्याला कोंब फुटले. काढणीला एकरी पाच हजाराचा खर्च येतो. एकरी ३० हजारापर्यंत खर्च केला.

मात्र खर्च निघायची शक्यता नाही. सहा एकर सोयाबीन सोडून द्यायची वेळ आली आहे. शेकडो शेतकऱ्यांचे ६० ते ७० टक्के सोयाबीन वाया गेले. कापसाची अवस्थाही अशीच आहे. फुटलेला कापूस भिजलाय. सतत पाणी साठून राहिल्याने झाडाच्या मुळ्या सडल्यात. पाते, बोंडे काळी पडलीत. पाने पिवळी पडलीत. त्यामुळे या भागात कापसाचा हंगामही लवकरच उरकावा लागणार असल्याचे दिसतेय.’’

अंदाजे १२०० कोटींचा फटका

सायोबीनला सध्या बाजारात पाच हजारापर्यंत दर आहे. त्यात वाढही होत आहे. सोयाबीनची एकरी सरासरी १४ ते १५ क्विंटलपर्यंत उत्पादन होते. त्यानुसार एकट्या नगर जिल्ह्याचा विचार करता सुमारे साडेपाच हजार टन सोयाबीनचे उत्पादन होते. मात्र यंदा ७० टक्के नुकसान झाले आहे. सरासरी ५० टक्के नुकसान गृहित धरले तरी पावसामुळे केवळ सोयाबीन उत्पादकांना जिल्ह्यात ११०० ते १२०० कोटींचा फटका बसण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली.

सततच्या पावसामुळे सोयाबीनचे पूर्णतः नुकसान झाले आहे. एकरी तीन-चार पोती निघणे मुश्किल झाले आहे. पावसामुळे हाती आलेले सोयाबीन गेले.
दत्तात्रेय तांबे, शेतकरी, मदमापूर, ता. राहाता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com