सटाण्यात गारपिटीमुळे टोमॅटोचे नुकसान

सध्या टोमॅटोला चांगला भाव मिळत असताना झालेल्या वादळी पावसाने जायखेडा येथील संपत दशरथ गायकवाड यांचे टोमॅटोचे पीकही भुईसपाट केले असून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सटाण्यात गारपिटीमुळे टोमॅटोचे नुकसान
TomatoAgrowon

जायखेडा, ता. सटाणा : जायखेडा शहरासह परिसरात रविवारी (ता. १२) दुपारी अडीचच्या सुमारास पूर्व मोसमी पावसाने वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. तसेच पावसाबरोबर तुरळक गारपीटही झाली. त्यामुळे टोमॅटोचे नुकसान झाले आहे. जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेती पिकांसह घरांचे व कांदा चाळींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दुपारी अडीचच्या सुमारास जोरदार वादळीवारा व पाऊस झाला. या वादळी पावसामुळे परिसरातील कांदा, टोमॅटो, मिरची आदींसह भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळामुळे जायखेडा येथील शेख जाकीर पापा यांच्या वाडीपीसोळ शिवारात असलेल्या शेतातील घराचे पत्रे उडाले. वादळ व पावसाचा जोर जास्त असल्याने काही शेतकऱ्यांच्या कांदा चाळीत पाणी शिरले. सध्या टोमॅटोला चांगला भाव मिळत असताना झालेल्या वादळी पावसाने जायखेडा येथील संपत दशरथ गायकवाड यांचे टोमॅटोचे पीकही भुईसपाट केले असून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Tomato
शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये: कृषी आयुक्त

जायखेडा-लाडुद रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक काही काळ बंद झाली होती. बऱ्याच ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तसेच काही ठिकाणी झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर पडल्याने तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला. सोमवारी (ता. १३) सकाळपासून विद्युतपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून विशेष मोहीम राबविण्यात येत असून समाधान काकड, पुंडलिक पवार, हेमंत पवार, कमलाकर सूर्यवंशी, कालिदास सोनवणे यांनी सकाळपासून परिश्रम घेत विजेचे खांब तसेच विद्युत तारा जोडल्या.

त्यामुळे काही ठिकाणी विद्युतपुरवठा सुरळीत करण्यात यश आले. दुपारपर्यंत सर्व विद्युतपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती जायखेडा महावितरणचे शाखा अभियंता नीलेश भोळे यांनी दिली. मोसम खोऱ्यातील मोठ्या प्रमाणात बहरलेल्या गावरान आंब्यांनाही या वादळी पावसाचा मोठा फटका बसला. आंब्याच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.

पेठ तालुक्यात घरांचे नुकसान

वादळी वाऱ्यामुळे पेठ तालुक्यातील खरपडी-फणस पाडा भागात अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले. तर चाऱ्याचे मोठे नुकसान झाले. तर कळवण तालुक्यातील बार्डे परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com