‘दामाजी’ देणार कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना सभासदत्व

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन, व्हाइस चेअरमन निवडीनंतर झालेल्या पहिल्या संचालक मंडळ बैठकीनंतर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी ही माहिती दिली.
Damaji Sugar Mill
Damaji Sugar MillAgrowon

सोलापूर ः मंगळवेढ्यातील दामाजी सहकारी साखर कारखान्याकडून (Damaji Sugar Mill) कार्यक्षेत्रातील सर्व सातबाराधारक शेतकऱ्यांना सभासदत्व (Membership For Farmer) देण्यात येईल, असा निर्णय कारखान्याच्या नवनियुक्त संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत घेण्यात आला. अशा पद्धतीने निर्णय घेणारा दामाजी साखर कारखाना हा पहिलाच कारखाना ठरला आहे.

Damaji Sugar Mill
Sugarcane FRP: एफआरपीच्या मुद्यावर तानाजी सावंत पुन्हा तोंडघशी

sugarcane श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन, व्हाइस चेअरमन निवडीनंतर झालेल्या पहिल्या संचालक मंडळ बैठकीनंतर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी ही माहिती दिली.

Damaji Sugar Mill
Sugar : साखरेच्या ‘एमएसपी’त वाढ करा ः इस्मा

पाटील म्हणाले, ‘‘कामगारांना मागणीप्रमाणे शनिवारची सुटी रद्द करून सोमवारची जाहीर केली आहे. कारखान्याच्या आर्थिक हितास प्राधान्य देऊन महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. नवीन सभासद होण्यासाठी भागभांडवल १० हजार व प्रवेश शुल्क १०० रुपये भरून घेऊन जागेवर पावती देऊन कारखान्याचे सभासद करून घेणार आहोत. तसेच ज्या सभासदांचे शेअर्स अपूर्ण आहेत. त्यांनी अपूर्ण रक्कम भरून घेऊन शेअर्स पूर्ण करून घ्यावा. या शिवाय मयत सभासदांच्या वारसांनी कारखाना कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी.’’

या बैठकीला व्हाइस चेअरमन तानाजी खरात, संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणू पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिद्ध लिगाडे, भिवा दोलतोडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, पीबी पाटील, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, अशोक केदार, तानाजी कांबळे, संचालिका निर्मला काकडे, लता कोळेकर आदी उपस्थित होते.

‘बैठक भत्ता घेणार नाही’

‘‘दामाजी साखर कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता आणि कारखाना योग्य पद्धतीने चालवण्यासाठी कमी खर्चात आणि काटकसरीने कारभार करण्यात येणार आहे. त्यासाठी संचालकांनी पुढाकार घेतला आहेच, पण आता सर्व संचालक बैठकीचा भत्ताही घेणार नाहीत,’’ असे पाटील यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com