पुणे जिल्हयातील धरणांनी गाठला तळ

जिल्ह्यातील आठ धरणे कोरडी; जोरदार पावसाची प्रतीक्षा
पुणे जिल्हयातील धरणांनी गाठला तळ
Water StockAgrowon

पुणे ः गेल्या काही महिन्यांपासून पुणे जिल्ह्यातील धरणांतील पाण्याचा वापर (Water Usage) वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांनी (Dam Water) तळ गाठला असून, आठ धरणे कोरडी पडली आहेत. सध्या जिल्ह्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा (Rain) आहे.

पुणे जिल्ह्यात लहान मोठी एकूण २६ धरणे आहेत. या धरणातील पाण्याचा वापर शेतीसाठी तसेच पुणे आणि पिंपरी- चिंचवड येथील नागरिकांना होतो. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अति उष्णतेमुळे धरणातील पाण्याची मागणी होती. त्यामुळे धरणातील पाण्याची पाणीपातळी झपाट्याने कमी झाली आहे. सध्या जिल्ह्यातील धरणांत अवघा २१.९२ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. येत्या काळात पाऊस न झाल्यास या धरणातील पाणीसाठा आणखी कमी होण्याची शक्यता आहे. तर पिंपळगाव जोगे, घोड, विसापूर, चिल्हेवाडी, मुळशी, टेमघर, नाझरे, उजनी ही धरणे कोरडी पडली आहेत. दहा धरणांत अत्यल्प म्हणजेच एक टीएमसीहून कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. उर्वरित धरणात अल्प पाणीसाठा आहे.

सध्या येडगाव धरणातून डाव्या कालव्याला १४००, चासकमान धरणातून ५६०, तर वीर धरणातून ८२७ क्युसेकने विसर्ग सोडलेला आहे. खडकवासला धरणातून उजव्या कालव्याला ११३४, वीर धरणातून १००३ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत ढगाळ हवामान असून काही भागात पाऊस होत आहे. परंतु धरणातील पाणीपातळी वाढविण्यासाठी जोरदार पावसाची गरज असून येत्या दहा ते पंधरा दिवसांत जोरदार झाल्यास ही धरणे पुन्हा धरणांत पाण्याची आवक सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

माणिकडोह ०.७५, येडगाव ०.७३, वडज ०.११, डिंभे ०.८१, कळमोडी ०.१०, चासकमान ०.६६, भामाआसखेड २.५६, वडिवळे ०.११, आंध्रा १.७३, पवना १.८८, कासारसाई ०.१६, वरसगाव १.८६, पानशेत १.७२, खडकवासला ०.४३, गुंजवणी ०.८४, नीरा देवघर १.४६, भाटघर १.९४, वीर ४.०७, उजनी -१.७९.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com