खेडमधील जगबुडी, नारिंगी नद्यांनी ओलांडली धोका पातळी

नदीपात्रातील पाणी किनाऱ्यावरील लोकवस्तीमध्ये शिरू लागल्याने प्रशासनाकडून सुरक्षिततेसाठी पावले उचलण्यात आली आहेत.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

रत्नागिरी ः जिल्ह्यात पावसाचा जोर (Rain Force In Ratnegiri) वाढला असून खेडमधील जगबुडी आणि नारिंगी (Narangi River) नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीपात्रातील पाणी किनाऱ्यावरील लोकवस्तीमध्ये शिरू लागल्याने प्रशासनाकडून सुरक्षिततेसाठी पावले उचलण्यात आली आहेत. पूरप्रवण क्षेत्रात येणारी गावे आणि शहरातील नागरिक, व्यापारी यांना सतर्क राहण्याच्या इशारा देण्यात आला आहे. खेड बाजारपेठेत पूर आलेला नसला, तरी या दोन्ही नद्यांच्या पाण्याचा वेढा शहराला कधीही पडण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) यंत्रणा सजग झाली आहे.

Heavy Rain
भाताची पेरणी पद्धतीने लागवड

मंगळवारी (ता. १२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत मंडणगडला १०५ मिलिमीटर, दापोली ६२, खेड १२१, गुहागर १५, चिपळूण ९३, संगमेश्‍वर १०८, रत्नागिरी १४, लांजा ९५, राजापूर ५१ मिलिमीटरची नोंद झाली आहे.

गेले आठ दिवस खेड तालुक्यात संततधार सुरू होती. त्यामुळे जगबुडी, नारंगी नद्या दुथडी भरून असून धोक्याची पातळी ओलांडली आहे. मोठ्या नद्यांना येऊन मिळणाऱ्या ओढे, वहाळ यांचे पाणी वाढले असून, डोंगराळ भागात दरड कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे किनारी भागातील शेतीची कामे रखडली आहेत. पावसाचा जोर वाढतच राहिला, तर खेड शहरात कधीही पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. अशी निर्माण झाल्यास मदतीसाठी एनडीआरएफचे पथक तैनात केले आहे. १८ प्रशिक्षित जवान आणि दोन वरिष्ठ अधिकारी खेड शहर व परिसरातील पूर्वपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दरड प्रवण क्षेत्रात राहणाऱ्या ग्रामस्थांच्या सुरक्षेची जबाबदारी याच पथकावर आहे. मुसळधार पावसामुळे सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या चिपळूण तालुक्यातील नांदीवसे ग्रामपंचायतीमधील राधानगरवाडीच्या वरील डोंगरास २०० मीटरची भेग पडली. गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी ग्रामस्थांशी चर्चा सुरू आहे.

समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील भात लावण्यांची कामे वेगाने सुरू आहेत. जिल्ह्यात ७० हजार हेक्टरवर भात लागवड होते. आतापर्यंत ३० हजार हेक्टरवरील भात लागवड पूर्ण झाली आहे. साधारणपणे चाळीस टक्केहून अधिक लागवडीची कामे पूर्ण झाल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले. याबाबत संगमेश्‍वर तालुक्यातील राजवाडी येथील शेतकरी सुहास लिंगायत म्हणाले, की सध्या पाऊस समाधानकारक पडत असल्यामुळे लावण्या व्यवस्थित सुरू आहेत. आणखी चार दिवसांत राजवाडी परिसरातील लावण्या पूर्ण होतील. जिथे पाणथळ जमीन आहे, तिथे पाणी साचून राहिल्यामुळे लावणीमध्ये अडचणी येत होत्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com