Girls Education : काळोखाला दूर सारू, सावित्रीच्या लेकी आम्ही!

रोजगाराच्या संधी व पोटापाण्याची खळगी भरण्यासाठी मध्य प्रदेशातून अनेक मजुरांचे स्थलांतर महाराष्ट्रात झाले आहे. कोणी गवंडीकाम, शेतीकामे तर मिळेल ती मजुरी करून जगण्याचा संघर्ष सुरू आहे.
Girls Educcation
Girls EduccationAgrowon

नाशिक ः रोजगाराच्या संधी व पोटापाण्याची खळगी भरण्यासाठी मध्य प्रदेशातून अनेक मजुरांचे स्थलांतर (Migrant Labor) महाराष्ट्रात झाले आहे. कोणी गवंडीकाम, शेतीकामे तर मिळेल ती मजुरी करून जगण्याचा संघर्ष सुरू आहे. मात्र, या धकाधकीत त्यांची बालके शिक्षणाच्या (Girls Education) मुख्य प्रवाहापासून वंचित होती.

शिक्षणाचे महत्त्व पटल्यानंतर त्यांची अमराठी मुले आता शाळेत धडे गिरवीत आहेत. त्यापैकी म्हणजेच नीलू, भगवती आणि अनिता या लाजाळू मुली आता शुद्ध मराठीत बोलू लागल्या आहे. वाचन, लेखन यांसह संवाद कौशल्य त्यांनी विकसित केले आहे. ‘काळोखाला दूर सारू, सावित्रीच्या लेकी आम्ही’ हा आशावाद त्यांनी निर्माण केला आहे.

Girls Educcation
Save Girl : तिसऱ्या मुलीच्या नावे एक लाखाची ठेव

शिंगवे (ता. निफाड) येथे उदरनिर्वाहासाठी मध्य प्रदेशातील सुखपुरी (ता. जि. बडवानी) येथून आलेले अनेक मजूर स्थिरावले आहेत. परंतु अनेक मुलांचे भविष्य अंधारात असून ते शाळाबाह्य असल्याची गंभीर परिस्थिती आहे. सामाजिक कार्यकर्ते धोंडीराम रायते यांनी पुढाकार घेऊन प्रवेश घेण्यासाठी वेळोवेळी आग्रह केला होता.

Girls Educcation
Girl Violence : मुलींचा श्‍वास कोंडला जात आहे?

गोदानगर येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ सुडके, स्मिता-लांडे सुडके, ताईबाई कोकाटे, सोमनाथ महालपुरे यांनी घरी जाऊन त्यांच्या पालकाचे समुपदेशन केले. त्यानंतर मुलांचा प्रवेश घेण्यासाठी हे मजूर तयार झाले. यापूर्वी वारंवार नकार देत मजूर प्रतिसाद देत नव्हते. ‘शिकून आमचं काय होणार?’ असे ठरलेले उत्तर होते. मात्र शिक्षणाचे महत्त्व पटवून दिल्यानंतर त्यांच्या मुलींना शाळेत प्रवेश दिला.

शिक्षकांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधारकार्ड काढून दिले. गणवेश व शालेय साहित्यही पुरविले. यासह सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती विद्यार्थी पात्र असल्याने शासनाला प्रस्ताव सादर केले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणाची कवाडे खुली झाल्याने त्या ज्ञानसंपन्न होत आहे.

महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा सावित्रीबाईंनी पुढे नेला. सावित्रीबाई म्हणतात, ‘विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून तिचा साठा ज्यापाशी, तो ज्ञानी मानिती जन’ हाच आदर्श विचार या मजुरांच्या होतकरू मुली सार्थ ठरवीत आहे.

उद्याचे उज्ज्वल भविष्य...

अंधाराला घाबरणं सोपं अन्‌ दिवा लावणं अवघड असतं. पण, कुणीतरी अवघड काम हाती घेणे जरुरीही असते. ते काम भारतीय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या प्रथम शिक्षिका सावित्रीबाई यांच्या थोरपणामुळेच हे शक्य होत आहे. म्हणूनच शाळेत प्रवेश घेतलेल्या मूळच्या मध्य प्रदेशातील सुखपुरी (ता. जि. बडवानी) येथील भगवती केंगलिया चौहान, निलू बियारी खोटे, अनिता कांजरा ठाकूर या मुली अभ्यासात कुशल झाल्या आहेत.

अशिक्षितपणामुळे मजुरीची वेळ आली. तुमची मुले शिकली नाही तर त्यांच्यावरही अशीच वेळ येईल. त्यामुळे शिकवा त्यांचे भविष्य घडवा असे मजुरांना सांगणे होते. हे मजूर माझ्यासोबत काम करतात, त्यांच्या मुलांनी शिक्षणासाठी पुढे यावे असे नेहमी वाटायचे. या मुली आता लिहू वाचू लागल्या आहेत, त्यांनी लाजरेबुजरेपणा बाजूला ठेवला आहे. भविष्यात त्या नाव उज्ज्वल करतील, अशी खात्री आहे. शाळेतील शिक्षकांचेही मोठे योगदान आहे.

- धोंडीराम रायते, सामाजिक कार्यकर्ते, शिंगवे, ता. निफाड

शिक्षणाचे महत्त्व पटवून दिल्यानंतर या मुलींना प्रवेशित केले. ‘शाळाबाह्य मजुरांची मुले शिकली पाहिजे’ हा आमचा नेहमी प्रयत्न राहिला आहे. आज ही मुले अभ्यासात चमकू लागल्याने आनंद वाटतो.

- नवनाथ सुडके, मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा, गोदानगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com