
अकोला : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात (Agriculture University) कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी आठवडाभरापासून आंदोलन (Agri Student Protest) करीत आहेत.
दिवसरात्र हे विद्यार्थी आंदोलन करीत असताना त्यांच्या मागण्यांवर कुठलाही तोडगा अद्याप निघाला नाही. प्रशासनानेही त्यांच्या मागण्यांकडे पाठ फिरवल्याचा आरोप हे आंदोलक विद्यार्थी करीत आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमातील बदलामुळे कृषी अभियांत्रिकीच्या पदवीधारकांवर अन्याय होत असल्याचा आरोप होत आहे.
हे अन्यायकारक धोरण तत्काळ थांबवून महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या २०२१-२२ ला तत्काळ स्थगिती द्यावी व अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे करावा यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी अभियांत्रिकी संघटनेच्या माध्यमातून कृषी अभियंत्यांचे राज्यव्यापी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे.
कृषी अभियंते या आंदोलनात रात्रंदिवस सहभाग घेऊन लढा देत आहेत. येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात प्रशासकीय कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू आहे.
मागण्यांच्या पूर्ततेसाठी विद्यार्थी ठाम बसलेले आहेत. राज्यशासन व आयोगाकडून लेखी स्वरूपात हमी मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.