‘पंदेकृवि’च्या कुलगुरूपदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (पंदेकृवि) विद्यमान कुलगुरूंचा कार्यकाळ सप्टेंबर २०२२ मध्ये संपत असल्याने तत्पूर्वी या पदासाठी नव्या व्यक्तीचा शोध घेणे सुरू झाले आहे.
PDKV
PDKVAgrowon

अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (Dr. Panjabrao Deshmukh Agriculture University) (पंदेकृवि) विद्यमान कुलगुरूंचा कार्यकाळ सप्टेंबर २०२२ मध्ये संपत असल्याने तत्पूर्वी या पदासाठी नव्या व्यक्तीचा शोध घेणे सुरू झाले आहे. या पदासाठी पात्र असलेल्या इच्छुकांकडून सोमवार (ता.२७) पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. प्राथमिक माहितीनुसार २५ पेक्षा अधिक अर्ज दाखल झाल्याचे सांगितले जाते.

कुलगुरू डॉ. विलास भाले यांचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात पूर्ण होत आहे. तत्पूर्वी ते वयोमानानुसारही सेवानिवृत्त होत आहेत. यामुळे या पदावर नवीन व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी शासनाकडून शोध समितीचे गठण करण्यात आले आहे.

PDKV
महात्मा फुले कृषी विद्यापीठ बीजोत्पादनात देशात प्रथम

या समितीने पात्र उमेदवारांचे कुलगुरूपदासाठी अर्ज मागवले आहेत. ही प्रक्रिया समितीचे नोडल अधिकारी डॉ. एन. पी. साहू हे सांभाळत आहेत. यापूर्वी राज्यात परभणी येथील कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी १५ जणांचे अर्ज पुढील प्रक्रियेसाठी निवडण्यात आलेले आहेत. अशाच पद्धतीने आता अकोल्यातील पदासाठी अर्जांची छाननी करून १५ अर्ज काढले जाऊ शकतात. कुलगुरू पदासाठी अकोला कृषी विद्यापीठातील चार ते पाच इच्छुक आहेत. त्यांनीही अर्ज दाखल केल्याचे सांगितले जाते. याशिवाय केंद्रीय संस्थांमधूनही काही अर्ज दाखल झालेले आहेत. १५ अर्जदारांच्या मुलाखती होणार असून त्यातून अंतिम मुलाखतीसाठी पाच अर्ज निवडून राजभवनात पाठवले जातील असे सांगितले जाते. पीएचडी, २० वर्षांचा अनुभव, प्रशासकीय कामकाजाचा अनुभव अशा विविध बाबींचा या कुलगुरू पदावर व्यक्ती निवडताना विचार केला जातो.

डॉ. भालेंच्या कारकिर्दीत दीक्षांत सोहळा

गेल्या शैक्षणिक सत्रातील पदवी, पदव्युत्तर शिक्षण तसेच आचार्य झालेल्यांना पदवी देण्यासाठी ७ जुलैला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दीक्षांत सोहळ्याचे नियोजन केले जात आहे. समारंभाला राजभवनातून हिरवी झेंडी मिळाल्याने तयारीसाठी विविध समित्या सक्रिय झाल्या आहेत. सध्याची राजकीय स्थिती पाहता हा समारंभ झाल्यास विद्यमान कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या कारकिर्दीतील शेवटचा मोठा सोहळा राहू शकतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com