Onion Subsidy : कांदा अनुदान नोंदणीसाठी २० एप्रिलपर्यंतची मुदत

Onion Rate : कांद्यांचे दर मोठ्या प्रमाणावर कोसळल्यानंतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने प्रतिक्विंटल ३५० रुपयांचे अनुदान जाहीर केले.
Onion Market
Onion MarketAgrowon

Onion Market Update Pune : कांद्यांचे दर (Onion Rate) मोठ्या प्रमाणावर कोसळल्यानंतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने प्रतिक्विंटल ३५० रुपयांचे अनुदान (Onion Subsidy) जाहीर केले.

हे अनुदान मिळण्यासाठी २० एप्रिलपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन पणन संचालक विनायक कोकरे यांनी केले आहे.

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, खासगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्तीधारकांकडे अथवा ‘नाफेड’कडे १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये व जास्तीत जास्त २०० क्विंटलच्या मर्यादेत प्रतिशेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

Onion Market
Onion Market : सरकारच्या अनुदानामुळे बाजारात कांदा दर पडले?

या अनुदानासाठी विहित नमुन्यातील अर्ज कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी बाजार, थेट पणन परवाना धारक, नाफेड खरेदी-विक्री केंद्र, जिल्हा उपनिबंधक, तालुका उप-सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. हे अर्ज भरून संबंधित कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन कोकरे यांनी केले.

Onion Market
Onion Rate : कांद्याला किलोला मिळाला अवघा सव्वा रुपयांचा दर

अर्जासोबत ही कागदपत्रे आवश्यक

- कांदा विक्रीची मूळपट्टी

- कांदा पिकाची नोंद असलेला ७/१२ उतारा

- बँक पास बुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत

- आधार कार्डची झेरॉक्स

...तर शपथ पत्र आवश्‍यक

सातबारा उतारा वडिलांच्या नावे आणि कांदा विक्रीची हिशेब पट्टी पाल्यांच्या अथवा अन्य कुटुंबीयांच्या नावे असल्यास अशा प्रकरणामध्ये सहमती असणारे शपथ पत्र आवश्यक आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com