Heavy Rain : पुराचा धोका पत्करून शेतकरी, मजुरांची जीवघेणी कसरत

गिरणाकाठच्या बोराळेतील स्थिती; सरकारने लक्ष देण्याची मागणी
Heavy Rain
Heavy Rain Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

नाशिक : अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) पाण्याची आवक वाढल्याने गिरणा धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग (Water Discharge) गिरणा नदीपात्रात सोडला जात आहे. त्यामुळे गिरणाकाठच्या बोराळे (ता. नांदगाव) येथे गंभीर पूरपरिस्थितीमुळे शेतकरी, विद्यार्थी, शिक्षक व मेंढपाळांसमोरील सर्व मार्गच बंद आहेत. पाणी ओसरल्यानंतर एकमेकांचे हात धरून व जीव मुठीत घेऊन नदी पार करण्याची कसरत करावी लागते. आता तर हाही मार्ग बंद झाला. या प्रश्‍नांवर स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी आवाज उठवून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार का, असा सवाल या भागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Heavy Rain
Cotton Rate : कापूस दरवाढ रोखण्याचा दबाव केंद्राने झुगारला

बोराळे गावची लोकसंख्या २५०० असून, येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेतीवर अवलंबून आहे. येथील एक हजार हेक्टरपैकी ५०० हेक्टर क्षेत्र गिरणा नदीपलीकडे आहे. यापैकी १२०० लोक नदीच्या पलीकडे राहतात. शेती जलसिंचनाची सोय नदीपलीकडे आहे. त्यामुळे रोज नदीचे पाणी उतरून शेतीपंप सुरू करण्यासाठी व शेतीकाम करण्यासाठी जावे लागते. पूर असताना पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने दुर्घटनेच्या शक्यतेने अनेकांच्या उरात धडकी भरते. शेतीसाठी लागणारे मजूरही जीव मुठीत धरून नदी पार करतात.

नदीपलीकडे धनगर समाजाची ५०० ची वस्ती आहे. येथील जिल्हा परिषदेची वस्ती शाळेवर असल्याने तेथे जाणाऱ्या शिक्षकांनासुद्धा रोज नदीच्या पाण्यातून जावे लागते. शेतीमाल काढण्यासाठी बैलगाडीचा वापर करावा लागतो. आतापर्यंत आठ ते दहा वेळा बैलगाडीचा अपघात झाला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांसह व बैलांनाही प्राण गमवावे लागले आहेत. १९७२ ते २०२२ पर्यंत आठ शेतकरी नदीपात्रात वाहून गेले आहेत. पाच ते सहा शेतकऱ्यांचे प्राण तरुणांनी वाचवले आहेत.

Heavy Rain
Sugar Industry : साखर कारखाना कामगारांना थकीत वेतन मिळवून द्या

२०१८ मध्ये तत्कालीन आमदार पंकज भुजबळ यांनी यासंबंधी तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. तर जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे यांना बैलगाडीतून बसवून नदी पार करताना केली जाणारी जोखमीची अशी थरारक कसरत त्या वेळी निदर्शनात आणून दिली होती, असे स्थानिक नागरिक नितेंद्र राजपूत यांनी सांगितले. मात्र याकडे कोणी लक्ष देणार का, असा सवाल शेतकरी करत आहेत.

Heavy Rain
Soybean Rate : सोयाबीन दर पुन्हा सावरले

शेतात जाण्यासाठी ४० किलोमीटरचा वळसा

गिरणा धरणातून १६ जुलै रोजी सुरू झालेला विसर्ग कायम आहे. १० ते १५ हजार क्युसेक पाणी रोज गिरणा नदीपात्रातून सुरू असते. त्यामुळे वेहेळगाव, मळगावमार्गे २५ किलोमीटरचा वळसा घालून पुलावरून शेतात जावे लागायचे; मात्र विसर्ग अधिक असल्याने हा पूलही पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे सायगाव, पिलखोड, गिरणा धरण फाटा असा ४० किलोमीटरचा वळसा घालून जनावरांना चारापाणी, शेतावर फेरफटका मारणे तसेच दूध काढण्यासाठी जाण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे.

शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींचा विचार व्हावा. लवकरात लवकर गिरणा नदी पात्रावर पूल व्हावा. शेतकऱ्यांच्या व विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात.

- भिलासाहेब राजपूत, प्रगतिशील शेतकरी, बोराळे, ता. नांदगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com