Farmer Death : विधानभवन परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू

देशमुख यांना गंभीर जखमी अवस्थेत जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले सहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर निवेदन करत असतानाच ही घटना घडली होती.
Farmer Death : विधानभवन परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू

मुंबई : पावसाळी अधिवेशनादरम्यान (Monsoon Session 2022) विधानभवनाच्या आवारात पेटवून घेणाऱ्या सुभाष भानुदास देशमुख (वय ५६) या शेतकऱ्याचा सोमवारी (ता. २९) उपचार सुरू असताना मृत्यू (farmer Death) झाला. देशमुख हे उस्मानाबाद जिल्ह्यातील तांदूळवाडीचे होते. शेती हडपल्यानंतर सर्वच पातळ्यांवर न्याय न मिळाल्याने अखेर त्यांनी न्याय मिळण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.

Farmer Death : विधानभवन परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू
Soybean Yellow Mosaic : सोयाबीनला विळखा ‘मोझॅक’चा

देशमुख यांना गंभीर जखमी अवस्थेत जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले सहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर निवेदन करत असतानाच ही घटना घडली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित शेतकऱ्याने आयनॉक्सजवळ आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले होते. तसेच तो १५ टक्के भाजला असल्याची माहिती सभागृहात दिली होती.

मात्र, देशमुख यांनी आधीच रॉकेल ओतून घेतले होते. विधानभवनाच्या आवारात आल्यानंतर त्यांनी पेटवून घेतले. आग विझवल्यानंतर ते तळमळत पडले होते. त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. ते ४५ टक्के भाजल्याने अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com