Wet Drought : ओला दुष्काळ जाहीर करा

चाळीसगाव येथील शेतकरी कृती समितीची मागणी; सरसकट भरपाई द्यावी
Wet Drought
Wet DroughtAgrowon

ग्रोवन वृत्तसेवा
चाळीसगाव ः जुलै महिन्यापासून ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत संपूर्ण चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील सर्व महसूल मंडळात अतिवृष्टी (Wet Drought) झाली होती. ज्यात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान (Crop Damage) झाले. जी काही पिके शेतात होती, त्यावर अतिवृष्टीमुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बसलेला फटका लक्षात घेता, शासनाने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी चाळीसगाव तालुका शेतकरी कृती समितीने केली आहे.

Wet Drought
Cotton Rate: कापसातील मंदी किती दिवस टिकेल ? | Agrowon | ॲग्रोवन

यंदा पावसाळ्यात सुरुवातीला चांगली परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. कपाशीसह इतर पिकांची लागवड झाल्यानंतर सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पिकांची उगवणही चांगली झाली. अशातच जुलै महिन्यापासून अधूनमधून पाऊस होत गेला. ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत संपूर्ण चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. ज्यामुळे अनेक गावांमधील शेतांमधून पाणी वाहिले. काही भागातील शेतांमध्ये तर तब्बल आठ दिवसांपर्यंत पाणी तुंबून होते. तालुक्यातील सर्व महसूल मंडळात अतिवृष्टीचा खरिपाच्या पिकांना फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अक्षरशः हिरावला गेला.

कपाशीची बोंडे पाण्यात गेल्याने हाती उत्पादनच आले नाही. जवळपास अशीच परिस्थिती इतर पिकांची होती. अतिवृष्टीमुळे मोसंबी, डाळिंब, चिकू आदी फळपिकांचेही मोठे नुकसान झाले. जी काही पिके शेतांमध्ये होती, त्यांच्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. कपाशीवर तर सप्टेंबर महिन्यातच ‘दहिया’ रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आले. या रोगाचा अटकाव करत नाही तोच पुन्हा ‘लाल्या’ रोगाचा प्रादुर्भाव वाढला.

Wet Drought
Soybean Market: सोयाबीन विक्रीसाठी बाजारात रांगा

आता तर बोंड अळीमुळे संपूर्ण पिके उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. सततच्या पावसामुळे फळबागांचे बहारच आले नाहीत. एकूणच संपूर्ण तालुक्यातील खरीप हंगामातील पीक वाया गेल्याने शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा व हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ सरसकट नुकसान भरपाई अदा करावी, अशी मागणी शेतकरी कृती समितीने केली आहे.

या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे तहसीलदार अमोल मोरे यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले. यावेळी विवेक रणदिवे, चंद्रकांत पाटील (शिरसगाव), सुभाष पाटील (पिंप्री), ज्ञानेश्वर पाटील (पिलखोड), सरपंच रावसाहेब पाटील (आडगाव), गोरख पारधी (डोण), पंडीत चव्हाण (बोढरे), जगन्नाथ शिंपी, समाधान सूर्यवंशी, अजय लोहार, नाना पाटील, नारायण पाटील, भास्कर पाटील, तुकाराम पाटील, दौलत कोळी, बापू चव्हाण आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com