Heavy Rainfall : अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीमुळे ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी.
Heavy Rainfall
Heavy RainfallAgrowon

अकोलाः जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीमुळे ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान (Crop Damage) भरपाई द्यावी, अशी मागणी समाज क्रांती आघाडीच्या वतीने अकोला जिल्हाध्यक्ष दिगंबर पिंप्राळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठवले.

Heavy Rainfall
Heavy Rain : चार जिल्ह्यातील दहा मंडळात अतिवृष्टी

अकोला जिल्ह्यात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तत्काळ सरकारने अकोला जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा व हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांना पुढील पिकांसाठी कर्ज लवकरात लवकर मिळावे यासाठी बॅंकांना निर्देश द्यावेत.

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांना आळा कसा घालता येईल यादृष्टीने सरकारने योग्य ते पाऊल उचलावे अशा विविध मागण्या करण्यात आल्या. समाज क्रांती आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिगंबर पिंप्राळे यांच्यासह पंजाबराव काळे, रहीमभाई कुरेशी, गणेश चौरागडे, रामेश्वर कावरे, रशीद खाँ अजीज खाँ, साबिर मिर्झा,उषा नारे, मंगला पाखरे यांच्यासह इतर उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com