Crop Damage : लाखांदूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत अतिवृष्टीमुळे लाखांदूर तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. त्याच्या परिणामी हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आले. शेकडो घरांची पडझड झाली. त्याची दखल घेत लाखांदूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

भंडारा : गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) लाखांदूर तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. त्याच्या परिणामी हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली (Crop Damage Due To Heavy Rain) आले. शेकडो घरांची पडझड झाली. त्याची दखल घेत लाखांदूर तालुक्यात ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले.

Crop Damage
Crop Damage : ऑगस्टमधील नुकसानीचे ४८ टक्के पंचनामे उरकले

निवेदनानुसार, भंडारा जिल्ह्यात गोसेखुर्द प्रकल्प आहे. त्यातील पाण्याचा विसर्ग होत असल्याने जिल्ह्याच्या अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यासोबतच जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाची संततधार होती. त्यामुळे इतरही प्रकल्प भरल्याने त्यातूनही पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या सर्व कारणांमुळे जिल्ह्यात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले, अनेक घरांची पडझड झाली, गोठ्यातील जनावरे दगावली. शासनाने या सर्व प्रकाराची दखल घेत तालुक्यातील आपदग्रस्त शेतकरी व नागरिकांना तत्काळ भरपाई मिळावी याकरिता हालचाल करणे आवश्यक आहे. त्यासाठी लाखांदूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे. पिक विम्याच्या भरपाईबाबत बीड पॅटर्न लागू करण्यात आला आहे. परंतु पूर्वसूचना दिल्यानंतरही कंपन्यांकडून पंचनामे करण्यास वेळकाढू धोरण अवलंबिले जाते. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. त्याची देखील गांभीर्याने दखल घेत वीमा कंपन्यांना पंचनामे वेळीच करण्याबाबत निर्देश देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

‘निधी तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा’

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी म्हणून ५० हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांना या अनुदान रकमेची प्रतीक्षा आहे. ही रक्कम वेळीच दिल्यास नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. त्यांना प्रोत्साहन मिळेल त्यामुळे शासनाने या बाबीचा गांभीर्याने विचार करून प्रोत्साहन निधी तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा अशी मागणी देखील निवेदनातून करण्यात आली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com