Wet Drought : नेवासा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

नेवासा तालुक्यात सातत्याने जोरदार पाऊस पडत असल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पीकविमा कंपन्यांनी अजूनही फारसे गांभिर्याने घेतले नाही.
Wet Drought
Wet DroughtAgrowon

नगर ः नेवासा तालुक्यात सातत्याने जोरदार पाऊस (Heavy Rainfall) पडत असल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले आहे. पीकविमा कंपन्यांनी (Crop Insurance Company) अजूनही फारसे गांभिर्याने घेतले नाही. पीकविम्या कंपन्यांना दखल घेण्याबाबत आदेश द्यावेत व तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे (Mahatma Phule Krushi Vidypeeth) माजी प्राचार्य डॉ. अशोक ढगे (Dr. Ashok Dhage) यांनी केली आहे.

Wet Drought
October Rain : ऑक्टोबरचा पाऊस

डॉ. ढगे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांना निवेदन दिले आहे. माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. अशोक ढगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की नेवासा तालुक्यात सातत्याने पाऊस पडत आहे. अनेक वेळा अतिवृष्टी झाली आहे.

त्यामुळे सोयाबीन, बाजरी, कापूस, मका यांसारख्या खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने अजून किमान वीस दिवस होणे अशक्य आहे.

रब्बी पेरणीही करता येत नाही पावसाने झालेल्या नुकसानीबाबत पीकविमा कंपन्यानी गांभीर्याने घेणे गरजेचे असताना पीकविमा कंपन्या दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळेल त्या अनुषंगाने पीकविमा कंपन्याकडून तत्काळ कार्यवाही होण्याविषयी व तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी डॉ. ढगे यांनी केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com