Ajit Pawar : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा

शेतकरी कर्जाच्या ओझ्याने कोलमडला आहे. त्यामुळे आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांना या संकटातून काढायचे असेल तर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून मदत केली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
Ajit Pawar
Ajit PawarAgrowon

बाळासाहेब पाटील ः ॲग्रोवन वृत्तसेवा

नागपूर : शेतकरी कर्जाच्या (Farmer Loan) ओझ्याने कोलमडला आहे. त्यामुळे आत्महत्या (Farmer Suicide) होत आहेत. शेतकऱ्यांना या संकटातून काढायचे असेल तर राज्यात ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करून मदत केली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. पवार यांच्या शासकीय निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

Ajit Pawar
Ajit Pawar: नुकसान भरपाईवरुन अजित पवार संतापले

पवार म्हणाले, ‘यंदा राज्यातला शेतकरी संकटात आहे. अतिवृष्टीने अनेक भागात पिके वाहून गेली आहेत. शेतजमिनी खरवडून गेल्याने नापिक झाल्या आहेत. पशुधन वाहून गेल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. लांबलेल्या परतीच्या पावसाने हाताशी आलेले पीक हिरावून घेतले आहे. खरिपाबरोबर रब्बीचा हंगाम वाया गेला आहे. कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, तीळ, मका, उडीद, मूग, तूर, धान, संत्रा पिकांचे झालेलं नुकसान प्रचंड आहे.

हवामान खात्याचा पावसाचा अंदाज चुकल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. विमा कंपन्यांकडून शेतकऱ्याची पिळवणूक होत आहे. पीक विम्याचे दावे मोठ्या प्रमाणावर नाकारण्यात आले असून प्रलंबित दाव्यांची संख्याही मोठी आहे. शेतकरी कर्जाच्या ओझ्याने कोलमडला असून दररोज तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत. या संकटातून शेतकऱ्याला बाहेर काढायचं असेल तर, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख, फळपिकांना हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत जाहीर करावी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी.

Ajit Pawar
Grape Crop Damage : माथेफिरूकडून ऐन हंगामात द्राक्ष बागेचे नुकसान

पिकांचे नुकसान व शेतमालाला भाव नाही, अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सापडला आहे. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील दशरथ लक्ष्मण केदारी यांच्यासारखे कितीतरी शेतकरी संकटात असून पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देत आत्महत्या करत आहेत. हे थांबण्यासाठी शेतकऱ्यांना मदत आणि कर्जमाफीचा निर्णय तत्काळ होण्याची गरज आहे. एका बाजूला नैसर्गिक आपत्ती, विमा कंपनीकडून होत असलेली पिळवणूक, सरकारी उदासीनता आणि दुसरीकडे सक्तीच्या वीजतोडणीमुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. यावर अधिवेशनात निर्णय होणे अपेक्षित आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar : शेतकऱ्यांनी माल मातीमोल विकू नये : अजित पवार

ते पुढे म्हणाले, ‘विदर्भाचा विकास व्हावा यासाठी गोसी खुर्द प्रकल्प शरद पवार यांनी कृषिमंत्रीपदाच्या काळात आणला. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हा प्रकल्प राज्यात असूनही त्याला शरद पवार यांच्या आग्रहास्तव राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा दिला. तरीही भाजपचे नेते खोटे बोलत आहेत. भाजप सरकारच्या काळात विदर्भावर अन्याय झाला आहे. पत्रकार परिषदेला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ‘शेकाप’चे जयंत पाटील, एकनाथ खडसे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, छगन भुजबळ, सुनील केदार, दिलीप वळसे-पाटील, सुनील प्रभू आदी नेते उपस्थित होते.

अधिवेशनात गोंधळ नाही

राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांचा रस्त्यावरील संघर्ष पाहता त्याचे पडसाद अधिवेशनात उमटतील असे वाटत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आम्ही गोंधळ घालणार नाही, असे स्पष्ट सांगितले. आम्ही चर्चेतून विकासाच्या मुद्द्यांवर मार्ग काढू. विधेयकांवर सविस्तर चर्चा झाली पाहिजे. उशिरापर्यंत सभागृह सुरू राहिले तरी आमची तयारी आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे नागपुरात अधिवेशन होऊ शकले नाही. त्यामुळे हे अधिवेशन तीन आठवड्यांचे व्हावी, अशी आमची मागणी आहे.असेही ते म्हणाले.

आता नाक तपासावे लागेल

‘अजित पवार यांच्या नाकाखालून सरकार नेले’ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारच्या मुंबईतील महामोर्चानंतर दिली होती. यावर पवार म्हणाले, नाकाखालून नेले की आणखी कुठून नेले हे सगळ्यांना माहीत आहे. आता तुमची नाकं तपासावी लागतील, असा टोला फडणवीस यांना लगावला. तसेच शिंदे यांनी बंड करून ते आमच्याकडे आले असे फडणवीस आधी सांगत होते. नंतर आपण काही आमदारांना फोन केल्याचे सांगितले. आता बदला घेतला हे उघड सांगत आहेत. त्यामुळे सर्वांना त्यांचे काम माहीत आहे, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे अधिवेशनात सहभागी होणार

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानपरिषदेचे सदस्य असल्याने ते कामकाजात सहभागी होणार का? असा प्रश्न विचारला असता ‘सोमवारी महाविकास आघाडीची बैठक होणार असून या बैठकीत उद्धव ठाकरे सहभागी होतील’ असे पवार म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com