Wet Drought : ओला दुष्काळ जाहीर करा; हेक्टरी लाख रुपये अनुदान द्या

सटाणा तालुक्यात अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. परतीच्या पावसामुळे रब्बीचा हंगामही धोक्यात आहे.
 Crop Damage
Crop DamageAgrowon

नाशिक : सटाणा तालुक्यात अतिवृष्टी (Heavy Rain) आणि ढगफुटीसदृश पावसामुळे (Rain Like Cloudburst) खरीप पिकांचे मोठे नुकसान (Kharif Crop Damage) झाले. परतीच्या पावसामुळे रब्बीचा हंगामही (Rabi Season) धोक्यात आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे आणि बागलाण तालुक्‍यात ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी एक लाख रुपयांचे अनुदान द्यावे, तसेच पीकविमा (Crop Insurance) काढलेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी, अशी मागणी बागलाणच्या माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

 Crop Damage
Crop Damage : मराठवाड्यात नुकसान क्षेत्र पोहोचले ३० लाख हेक्टरवर

माजी आमदार चव्हाण यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेऊन तालुक्यातील शेतीच्या नुकसानीसंदर्भात चर्चा करून निवेदन दिले.

 Crop Damage
Crop Damage : मराठवाड्यात नुकसान क्षेत्र पोहोचले ३० लाख हेक्टरवर

यंदाच्या पावसाळ्यामध्ये सातत्याने झालेल्या ढगफुटीसदृश अतिवृष्टीत शेतकऱ्यांची अत्यंत दैनावस्था झाली असून हातातोंडाशी आलेली पिके सडून गेली आहेत. फळबागांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. हाती दोन पैसेही शिल्लक राहिलेले नाहीत. बहुतांश शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली आहेत. शेतकऱ्यांना शासनाने आधार द्यावा, अशी मागणी ग्रामीण भागातून जोर धरू लागली आहे.

 विमा कंपन्यांकडून क्रूर थट्टा

संकटात शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे; मात्र शासनाचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. शेतकऱ्यांनी पीकविमा काढला असतानासुद्धा विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली जात आहेत. विमा कंपन्यांकडून क्रूर थट्टा होत असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com