Seed : महाबीजच्या खरीप बिजोत्पादन क्षेत्रात घट

महाबीजच्या परभणी विभागात दरवर्षी खरिपात सोयाबीन, तूर, मूग, उडीद, बाजरी आदी पिकांचा बिजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येतो. सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक असते.
Seed
Seed Agrowon

परभणी ः महाबीजच्या (Mahabeej) परभणी विभागअंतर्गतच्या परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या सहा जिल्ह्यांमध्ये यंदाच्या (२०२२) खरीप हंगामात (Kharif Season) ७ हजार ३४४ नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या १३ हजार ५८२ हेक्टरवर विविध पिकांचा बिजोत्पादन (Seed Production) कार्यक्रम घेण्यात येत आहे. गतवर्षीच्या (२०२१) तुलनेत यंदा बिजोत्पादन क्षेत्रात (Area Of Seed Production) ६ हजार ५४८ हेक्टरने घट झाली आहे.

महाबीजच्या परभणी विभागात दरवर्षी खरिपात सोयाबीन, तूर, मूग, उडीद, बाजरी आदी पिकांचा बिजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येतो. सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक असते. गतवर्षी (२०२१) मध्ये लक्षांक ३२ हजार हेक्टरचा लक्षांक असताना २० हजार १३० हेक्टरवर बिजोत्पादन कार्यक्रम घेण्यात आला. परंतु काढणीच्यावेळी पावसात भिजल्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिकांच्या बियाण्याच्या दर्जावर परिणाम झाला.

Seed
Mahabeej : ‘महाबीज’चे व्यवस्थापकीय संचालकपद पुन्हा पोरके

यंदाच्या (२०२२) उन्हाळी हंगामात सोयाबीनचा २ हजार ३६६ हेक्टर बिजोत्पादन घेण्यात आले. त्यापासून ४ हजार २०० क्विंटल कच्चे बियाणे उपलब्ध झाले. खरीप तसेच उन्हाळी हंगामात सोयाबीनमध्ये नापास बियाण्याचे प्रमाण जास्त राहिले. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील बिजोत्पादन कार्यक्रमासाठी पुरेशा प्रमाणात पायाभूत स्रोत बियाणे उपलब्ध झाले नाही. त्यामुळे बिजोत्पादन क्षेत्रात घट झाली आहे यंदाच्या खरीप हंगामात २२ हजार ५०० हेक्टरवर बिजोत्पादनाचा लक्षांक असताना प्रत्यक्षात १३ हजार ५८२ हेक्टरवर बिजोत्पादनासाठी पेरणी झाली.

Seed
Oil Seed : तेलबियांसाठी हमीभावाची प्रभावी अमंलबजावणी करा

यंदा विभागात सोयाबीनचे ७ हजार १६ शेतकऱ्यांनी १३ हजार १५८ हेक्टरवर बिजोत्पादन घेतले आहेत. त्यात परभणी जिल्ह्यात २ हजार १७० शेतकऱ्यांनी ३ हजार ९५८ हेक्टर, हिंगोली जिल्ह्यात १ हजार ६०९ शेतकऱ्यांनी ३ हजार १९२ हेक्टर, नांदेड जिल्ह्यात २३२ शेतकऱ्यांनी ४४१ हेक्टर, लातूर जिल्ह्यातील १ हजार ९५१ शेतकऱ्यांनी ३ हजार ५४२ हेक्टर, उस्मानाबाद जिल्ह्यातील ९८३ शेतकऱ्यांनी १ हजार ८८७ हेक्टर, सोलापूर जिल्ह्यातील ७१ शेतकऱ्यांनी १३७ हेक्टरवर बिजोत्पादन क्षेत्राचा समावेश आहे.

तुरीचे परभणी, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यातील १५७ शेतकऱ्यांनी १९७.२० हेक्टर बिजोत्पादन घेतले आहे. उडदाचे सर्व सहा जिल्ह्यातील १०३ शेतकऱ्यांनी १०५.२० हेक्टर, परभणी जिल्ह्यात मुगाचे ५३ शेतकऱ्यांनी ६१.२० हेक्टर, बाजरीचे १ शेतकऱ्याने १.६० हेक्टर बिजोत्पादन घेतले. ज्युटचे परभणी, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील १४ शेतकऱ्यांनी ५९.२० हेक्टरवर बिजोत्पादन घेतले आहे.

स्त्रोत बियाणे कमी प्रमाणात उपलब्ध झाले. त्यामुळे यंदा बिजोत्पादन क्षेत्रात घट झाली.
डि.डि.कान्हेड, विभागीय व्यवस्थापक, महाबीज, परभणी.

परभणी विभाग एकूण बिजोत्पादन स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये) जिल्हा...क्षेत्र...शेतकरी संख्या परभणी...४१२०.८०...२२७२ हिंगोली...३१९४.४०...१६११ नांदेड...४४८...२३५ लातूर...३६८६...२१०७ उस्मानाबाद...१९४४.८०...१०२९ सोलापूर...१८८.८०...९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com