
अमरावती : रब्बी हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा पेरणी क्षेत्र कमी असण्यासोबतच हरभरा व गव्हाचे पेरणी क्षेत्रही कमीच आहे. गव्हाची पेरणी जानेवारीपर्यंत चालत असली तरी ते ४० हजार हेक्टरपर्यंत राहण्याची शक्यता असून गतवर्षी हेच क्षेत्र ५० हजार हेक्टरवर होते. हरभऱ्याचेही क्षेत्र १३ हजार हेक्टरने कमी झाले आहे.
जिल्ह्यात रब्बी हंगामात यावर्षी सरासरी १ लाख ४८ हजार ८७९ हेक्टर क्षेत्रात पेरणी अपेक्षित करण्यात आली होती. गतवर्षीपेक्षा यंदा तीन हजार हेक्टरने वाढ झाली असली पेरणी क्षेत्र मात्र घटले आहे. गहू व हरभरा ही या हंगामातील मुख्य पिके आहेत. कमी कालावधी व खर्चात अधिक उत्पादन देणारे पीक म्हणून हरभऱ्याकडे बघितले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचा अधिक कल या पिकाकडे राहतो. गतवर्षी जिल्ह्यात १ लाख २२ हजार ३१८ हेक्टर क्षेत्र हरभऱ्याखाली होते. यंदा मात्र त्यामध्ये घट आली असून १२ हजार ९९८ हेक्टर क्षेत्र कमी झाले आहे.
हरभऱ्याचे क्षेत्र कमी होत असतानाच गव्हाचीही पेरणी कमी झाली आहे. आतापर्यंत केवळ १३ हजार १०१ हेक्टरमध्येच पेरणी झाली असून एकूण सरासरी क्षेत्रापैकी २६ हजार १४९ हेक्टर क्षेत्र शिल्लक आहे. या क्षेत्रात आगामी काळात पेरणी अपेक्षित केली तरी जिल्ह्यात या पिकाखाली ४० हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र पेरणीखाली येणार आहे. गतवर्षी ५० हजार ४७६ हेक्टरमध्ये पेरणी होती.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.