Soybean Productivity : पावसाने सोयाबीन उत्पादकतेत घट

संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे यंदा सोयाबीनची उत्पादकता प्रभावित झाल्याचा दावा केला जात होता.
soybean rate
soybean rate agrowon

अमरावती : संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे (Heavy rain)यंदा सोयाबीनची उत्पादकता (Soybean Productivity) प्रभावित झाल्याचा दावा केला जात होता. मात्र अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांमध्ये उत्पादकतेने सरासरी गाठली असून, केवळ यवतमाळ आणि अमरावती या दोन जिल्ह्यांतच सोयाबीनला फटका (Soybean Crop Damage) बसल्याचे पीककापणी प्रयोगाअंती समोर आले आहे.

अमरावती विभागात अकोला, वाशीम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. विभागातील पाच तालुक्यांत १० लाख ३४ हजार ६९२ हेक्टर कापसाखालील सरासरी क्षेत्र आहे. त्या तुलनेत यंदा दहा लाख ७५ हजार ९५४ हेक्टरवर लागवड झाली. यवतमाळ जिल्ह्यात सुमारे ४ लाख ४६ हजार ७०७ हेक्टरवर कापसाची लागवड होते. त्यापाठोपाठ २ लाख ९२ हजार ४७६ हेक्टरवर सोयाबीन हे पीक घेतले जाते.

soybean rate
Soybean rate : सोयाबीन सहा हजाराचा टप्पा ओलांडणार का?

वाशीम जिल्ह्यात सोयाबीन हे मुख्य पीक असून ३ लाख ५९ हजार ८८ हेक्टर पेरा होता. या जिल्ह्यात कापसाचा पेरा गेल्या काही वर्षात कमी झाला असून तो अवघा २२ हजार ३४ हेक्टरवर आहे. या वर्षीच्या खरिपात पावसाने सुरुवातीला ओढ दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. त्यानंतर जुलै महिन्यापासून ऑक्टोबरअखेर पर्यंत पावसाची संततधार होती.

अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली. या साऱ्याचा फटका कपाशी आणि सोयाबीन या दोन मुख्य पिकांना बसला. हेक्टरी सरासरी उत्पादकता कमी होईल, अशी अपेक्षा या पार्श्‍वभूमीवर व्यक्त केली जात होती. परंतु कृषी विभागाच्या पीककापणी प्रयोगांती वेगळेच वास्तव समोर आले आहे.

soybean rate
Farmer Life : अॅग्रोवनचा प्रतिनिधीचा एक दिवस शेतकऱ्यांसोबत

कृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती विभागाची सरासरी उत्पादकता ११ क्विंटल १२ किलो आहे. यंदा पीककापणी प्रयोगातून अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांची उत्पादकता हेक्टरी १७ ते १८ क्विंटल दरम्यान मिळाली आहे. सोयाबीनचे हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशीम जिल्ह्यातही उत्पादकतेने १४ क्विंटलचा पल्ला गाठला आहे.

तीन जिल्ह्यांत सोयाबीनची उत्पादकता सरासरी इतकी झाली असतानाच अमरावती आणि यवतमाळ हे दोन जिल्हे मात्र उत्पादकतेच्या बाबतीत माघारले आहेत. अमरावती जिल्ह्यात हेक्टरी सात क्विंटल इतकी उत्पादकता झाल्याचे सांगण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातही ७.८५ क्विंटल इतकी अत्यल्प उत्पादकता मिळाली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com