जोरदार पावसामुळे टँकरच्या संख्येत घट

राज्यात चालू वर्षी १४ मार्चपासून पाणी टंचाईच्या झळा सुरू झाल्या होत्या. सुरुवातीला पाच जिल्ह्यांतील ६० गावे व ९३ वाड्यांना ३४ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता.
Water Tanker
Water TankerAgrowon

पुणे ः पावसाळा सुरू होऊन जवळपास सव्वा महिना लोटला आहे. या कालावधीत कमीअधिक पाऊस (Excess Rain) पडला. मात्र, गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस (Heavy Rainfall) बरसत आहे. यामुळे राज्यातील टँकरच्या (Water Tanker) संख्येत तब्बल २१३ टँकरने घट झाली आहे. सध्या ३०६ गावे व ५२६ वाड्यावस्त्यांवर २८३ टँकरने पाणी पुरवठा (Water Supply) सुरू असून येत्या काळात ही संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

Water Tanker
मावळात ४० नळ पाणी पुरवठा योजनांना मान्यता

राज्यात चालू वर्षी १४ मार्चपासून पाणी टंचाईच्या झळा सुरू झाल्या होत्या. सुरुवातीला पाच जिल्ह्यांतील ६० गावे व ९३ वाड्यांना ३४ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता. त्यामुळे टँकरच्या संख्येत हळूहळू वाढ होत गेली. त्यातच मॉन्सून राज्यात दाखल होऊनही पुरेसा पाऊस न पडल्याने ऐन जूनमध्ये उन्हाच्या झळा आणखी तीव्र झाल्या होत्या. त्यामुळे टँकरच्या संख्येत वाढ झाल्याची स्थिती होती. उन्हाळ्यात नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा व्हावा म्हणून शासनाच्या माध्यमातून दरवर्षी टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो. यंदाही टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून त्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याऐवजी प्रांताधिकारांना दिले आहे. त्यामुळे या टँकरच्या संख्येत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.

Water Tanker
ऐन पावसाळ्यात टॅंकरने पाणी पुरवठा सुरूच

यंदा पूर्वमोसमी पावसाची दडी व जून महिन्यात मॉन्सूनचा अभाव यामुळे राज्यात सरासरी असलेल्या २०९.८ मिलिमीटरपैकी अवघा १४७.५ मिलिमीटर म्हणजेच ७० टक्के पाऊस पडला होता. यातही मराठवाड्यात पावसाने सरासरी गाठली असली तरी कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची तूट दिसून आल्याने पाणी टंचाईच्या झळा कमी होत नसल्याचे स्थिती होती. जून महिना अखेरीपर्यंत राज्यातील ६१० गावे व १२६६ वाड्यावस्त्यांवर जवळपास ४९६ टँकर रोज धावत होते. यामध्ये सरकारी ६६ तर खासगी ४३० टँकरचा समावेश होता. परंतु जूनच्या अखेरीस पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने जुलैच्या सुरुवातीपासून मॉन्सून पुन्हा सक्रिय होत पावसाने सुरुवात केली.

गेल्या वर्षी याच काळात १०९ गावे व १२५ वाड्यावस्त्यांवर ९४ टॅंकरने पाणी पुरवठा सुरू होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टँकरची संख्या वाढलेली दिसून येते. सध्या ठाणे विभागात नऊ गावे व आठ वाड्यावस्त्यांवर सात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. नाशिक विभागात १०७ गावे व १७८ वाड्यावस्त्यांवर तब्बल ७५ टँकर, पुणे विभागात ६० गावे व ३२२ वाड्यावस्त्यांवर ६५ टँकर, मराठवाड्यातील २४ गावे व १८ वाड्यावस्त्यांवर ३१, विदर्भातील अमरावती विभागात ८६ गावांमध्ये ८८ टँकरने तर नागपूर विभागात २० गावांमध्ये १७ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

जिल्हानिहाय टँकरची संख्या :

जिल्हा --- गावे --- वाड्या --- टँकरची संख्या

रायगड --- ९ --- ८ --- ७

नाशिक --- ४८ --- ४० --- ३४

नंदुरबार --- ० --- २ -- १

जळगाव --- १३ --- ० --- ११

नगर --- ४३ --- १३४ --- २६

पुणे --- ४३ --- २८३ --- ५२

सातारा -- १६ -- ३९ --- ५२

सांगली --- १ --- ० --- १

औरंगाबाद -- ४ --- १ --- ५

बीड -- ५ --- ४ --- ६

हिंगोली -- ३ --- ० --- ३

नांदेड --- १२ --- १३ -- १७

अमरावती -- २० -- ० --- २४

वाशीम -- ८ ---० --- ८

बुलडाणा -- २७ --- ० --- २७

यवतमाळ --- ३१ -- ० --- २९

नागपूर -- २० -- ० -- १७

----

टँकर सुरू नसलेले जिल्हे :

ठाणे, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, जालना, परभणी, उस्मानाबाद, लातूर, अकोला, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com