Diwali Lakshmipujan : समर्पित अनोखे लक्ष्मीपूजन

शेतकरी श्‍यामराव मोगल यांच्या उपक्रमाची चर्चा
Diwali
DiwaliAgrowon

नाशिक : निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे येथील प्रयोगशील शेतकरी (Experimental Farmer) श्‍यामराव मोगल (Shamrao Mogal) हे विषमुक्त पद्धतीने शेती करतात. शेतीत राबताना कृषी संस्कृतीचे महत्त्व त्यांनी जपले आहे. सेंद्रिय निविष्ठांचा वापर, मृदा आरोग्य, सिंचन व्यवस्थापन, देशी गायींचे संगोपन, देशी बियाणे संकलन व संवर्धन हे प्रयोग ते राबवीत आहेत.

शेतीला लक्ष्मी मानणाऱ्या श्‍यामराव यांनी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आई, वडील, गाय आणि काळ्या आईच्या साक्षीने लक्ष्मीपूजन साजरे केले. त्याचे कसबे सुकेणे व परिसरात स्वागत करण्यात आले.

Diwali
Agrowon Diwali Ank : ॲग्रोवन दिवाळी अंकात वाचा स्वयंसेवी संस्थांची कहाणी | ॲग्रोवन

श्‍यामराव यांच्या पत्नी वर्षा यांचे कर्करोगामुळे निधन झाले. सुखी संसार अर्ध्यावरच मोडला. आधीपासूनच सेंद्रिय शेतीकडे वळलेले श्यामराव आरोग्यदायी, सकस अन्ननिर्मितीबाबत अधिक गंभीर झाले. द्राक्षे, गहू, कांदा, गूळ आदींसाठी थेट ग्राहक बाजारपेठ तयार करण्यात ते यशस्वी झाले. फक्त पैसा नको तर पुढच्या पिढीच्या आरोग्याचा विचार केला पाहिजे, या उद्देशाने त्यांनी सेंद्रिय शेतीबाबत प्रबोधनही सुरू केले.

सकस अन्नाबाबत जागृती

रासायनिक अवशेषमुक्त किंवा सेंद्रिय शेतीत आपली ठळक ओळख त्यांनी तयार केली आहे. मानवी आरोग्य व पर्यावरण हिताला सर्वोच्च प्राधान्य देत केवळ उत्पादनावर भर न देता लोकांमध्येही सकस व आरोग्यदायी अन्नाबाबत जागृती करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.

मौजे सुकेणे, ता. निफाड, जि. नाशिक : कुटुंबासमवेत अनोख्या पद्धतीने लक्ष्मीपूजन करताना प्रयोगशील शेतकरी श्यामराव मोगल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com